Kidney failure symptoms in women saam tv
लाईफस्टाईल

Kidney inflammation: किडनीला सूज आल्यानंतर शरीर देतं ५ मोठे संकेत; वेळीच करून घ्या उपचार

Symptoms of kidney inflammation : मानवी शरीरातील किडनी हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे काम करतो. किडनीला सूज येणं किंवा संसर्ग होणं ही एक गंभीर समस्या आहे

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करतं. पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते त्यावेळी शरीरात टॉक्सिन्स जमा होतात. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

यावेळी रूग्णाला सांधेदुखी, युरिक अ‍ॅसिड वाढणं, वारंवार लघवी होणं यांसारख्या त्रासांची सुरुवात होऊ शकते. काहींना किडनीमध्ये सूज येण्याची समस्या भेडसावते. किडनीची सूज कायम राहिली तर रूग्णाला इन्फेक्शन होण्याचा धोकाही अधिक असतो.

किडनीला सूज आल्यानंतर काही प्रकारची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं वेळेत ओळखली तर रूग्णाला उपचार घेण्यास मदत होते. वैद्यकीय भाषेत या परिस्थितीला किडनीतील सूज ‘हायड्रोनफ्रोसिस’ म्हणून ओळखलं जातं. पाहूयात किडनीला सूज आल्यानंतर कोणती लक्षणं दिसून येतात.

शरीराच्या विविध भागांमध्ये सूज

जर तुमच्या शरीरातील इतर भागांमध्ये सातत्याने सूज दिसून येत असेल तर हे किडनीला सूज आल्याचं लक्षण असू शकतं. यावेळी रूग्णाचा चेहरा सकाळी सूजलेला वाटू शकतो. त्याचप्रमाणे पाय आणि टांचांमध्येही सूज दिसून येते.

सतत थकवा जाणवणं

किडनी नीट काम करत नसल्यामुळे शरीरात टॉक्सिन्स साचून राहतात. अशावेळी थकवा जाणवू शकतो. आराम करून देखील हा थकवा जात नाही. अशावेळी तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

लघवीमध्ये बदल

किडनीचं प्रमुख काम हे लघवीतून टॉक्सिन घटक बाहेर टाकणं हे असतं. मात्र ज्यावेळी किडनीला सूज येते तेव्हा ही प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नाही. परिणामी लघवीमध्ये फेस दिसणं किंवा रंग बदलणं असे बदल दिसून येतात.

नीट झोप न लागणे

किडनीच्या कामात अडथळा आल्याने व्यक्तीला झोपेच्या समस्याही उद्भवू शकतात. यामध्ये किडनीला सूज आल्याने शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडतं आणि झोपेवर परिणाम होतो.

भूक मंदावणे

जर तुमची अचानक भूक मंदावली असेल तर हे किडनीला सूज येण्याचं लक्षण असू शकतं. यावेळी मळमळ किंवा उलट्या होण्याचा त्रासही होतो. यामध्ये किडनीला सूज आल्यानंतर शरीरात द्रवपदार्थ साचतात आणि भूकेवर परिणाम होतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महानगरपालिकेकडून आंदेकरांच्या वारकरी भवन वर कारवाई

Amla Pickle Recipe: घरच्या घरी बनवा आवळ्याचं आंबट गोड लोणचं, सर्वजण चाटून पुसून खातील

Delhi car Blast Live updates : हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा

Priyadarshini Indalkar: अभिनेत्रीचा बोल्ड लूक, डिपनेक लेहेंग्यात खुललं प्रियदर्शनीचं सौंदर्य

GK : 1000 व्ह्यूजमागे Youtube किती पैसे मिळतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT