Heart blockage saam tv
लाईफस्टाईल

Heart blockage: 15 वर्षांपूर्वी हृदयात स्टेंट बसवला; धाप लागायची, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, 52 वर्षीय व्यक्तीला डॉक्टरांनी कसं दिलं जीवदान?

मालाडमधील 52 वर्षीय रुग्णाच्या 15 वर्षांपूर्वी बसवलेल्या स्टेंटमध्ये पुन्हा अडथळा निर्माण झाल्यानंतर ठाण्यात प्रथमच कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करण्यात आली. किम्स हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी उपचार करून रुग्णाला नवजीवन दिलं.

Surabhi Jayashree Jagdish

मालाडमधील ५२ वर्षीय एका व्यक्तीला काही महिन्यांपासून अगदी साधी कामं करतानाही श्वास घेण्यास त्रास होत होता. थोडं चाललं, जिना चढला किंवा किराण्याच्या पिशव्या उचलल्या तरी छातीत दुखणं आणि धाप लागणं सुरू झालं होतं. १५ वर्षांपूर्वी त्यांच्यावर हृदयाची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यामुळे पुन्हा हृदयात काही गंभीर समस्या निर्माण झाली असावी अशी शंका डॉक्टरांना आली.

तपासणी केल्यानंतर या व्यक्तीच्या हृदयातील १५ वर्षांपूर्वी बसवलेला स्टेंट पुन्हा मोठ्या प्रमाणात अरुंद झाल्याचं आढळलं. वैद्यकीय भाषेत याला 'इन-स्टेंट रिस्टेनोसिस' असं म्हटलं जातं. याशिवाय हृदयाच्या आणखी दोन रक्तवाहिन्यांमध्येही गंभीर अडथळे असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे उपचार करणं डॉक्टरांसाठी मोठं आव्हान होतं.

सुरुवातीला नेहमीप्रमाणे अँजिओप्लास्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रक्तवाहिनीतील अडथळा इतका मोठा होता की नेहमी वापरल्या जाणाऱ्या बलून आणि कॅथेटरच्या मदतीने तो दूर करणं शक्य झालं नाही. त्यामुळे पारंपरिक उपचारपद्धतीने अपेक्षित यश मिळण्याची शक्यता कमी होती.

अशावेली ठाण्यातील किम्स हॉस्पिटल्स हृदयरोग तज्ज्ञांनी वेगळा पर्याय निवडला. ठाणे आणि मुंबई उपनगरांमध्ये प्रथमच कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करण्यात आली. या उपचारात विशेष प्रकारच्या अल्ट्राव्हायोलेट लेझरच्या मदतीने रक्तवाहिनीत तयार झालेला कडक थर, जुन्या जखमेचे टिश्यू आणि रक्ताच्या जुन्या गाठी अतिशय सूक्ष्म पातळीवर काढून टाकल्या जातात. त्यानंतर अँजिओप्लास्टी करून रक्तप्रवाह पूर्ववत केला जातो.

ही प्रक्रिया किम्स हॉस्पिटल्सच्या कार्डियाक सायन्सेस विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. बी. सी. कलमठ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या उपचारादरम्यान जुन्या स्टेंटमधील अडथळा दूर करण्यात आला. त्याचवेळी हृदयातील इतर दोन रक्तवाहिन्यांमधील गंभीर अडथळ्यांवरही यशस्वी उपचार करण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली. दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. डॉ. बी. सी. कलमठ यांनी सांगितलं की, हे अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण होतं. जुन्या स्टेंटमध्ये पुन्हा अडथळा निर्माण झाल्याने नेहमीच्या पद्धतीने उपचार करणं शक्य नव्हतं. लेझर तंत्रज्ञानामुळे रक्तवाहिनीतील कडक थर अचूकपणे काढून टाकता आला आणि त्यानंतर सुरक्षितपणे अँजिओप्लास्टी पूर्ण करता आली. याच प्रक्रियेदरम्यान इतर दोन अडथळ्यांवरही उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्ण दुसऱ्याच दिवशी स्थिर अवस्थेत घरी जाऊ शकला.

सामान्य अँजिओप्लास्टीमध्ये रक्तवाहिनी रुंद करण्यासाठी बलून आणि स्टेंटचा वापर केला जातो. मात्र, काही रुग्णांमध्ये अनेक वर्षांनंतर स्टेंट पुन्हा अरुंद होतो किंवा रक्तवाहिनीत कॅल्शियमचा जाड थर साचतो. काही वेळा जुन्या रक्तगाठींमुळेही अडथळा निर्माण होतो. अशा गुंतागुंतीच्या रुग्णांसाठी लेझर अँजिओप्लास्टी अधिक प्रभावी पर्याय मानला जातो. लेझरच्या नियंत्रित किरणांमुळे कठीण थर अगदी लहान कणांमध्ये तुटतो आणि पुढील उपचार अधिक सुरक्षितपणे करता येतात.

भारतात हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार हे मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक मानलं जातात. बहुतेक रुग्णांमध्ये सामान्य अँजिओप्लास्टी यशस्वी ठरतं. मात्र जुना स्टेंट पुन्हा बंद होणं किंवा रक्तवाहिनीत कठीण अडथळे निर्माण होणं अशा परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासते.

तज्ज्ञांच्या मते, ज्यांच्यावर पूर्वी अँजिओप्लास्टी झालीये त्यांनी अनेक वर्षांनंतरही छातीत दुखणं, श्वास लागणं, चालताना दम लागणं किंवा व्यायाम करण्याची क्षमता कमी होणं यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर तपासणी केल्यास गंभीर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच रक्तवाहिनीतील अडथळा शोधून त्यावर उपचार करता येऊ शकतात.

ठाणे आणि मुंबई उपनगरांमध्ये प्रथमच करण्यात आलेल्या या लेझर अँजिओप्लास्टीमुळे केवळ एका रुग्णाला नवजीवन मिळाले नाही, तर या भागातील हृदयरोग उपचार क्षेत्रातही एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर जिल्ह्यातील धरणांमध्ये ५७ टक्के पाणीसाठा, गेल्या वर्षाच्या तुलनेत घट

CJP Protest: आम्हाला आज अटक करणार, अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Top 10 Actresses : टॉप १० लोकप्रिय अभिनेत्रींची यादी जाहीर; रश्मिका-आलिया नाही तर 'ही' अभिनेत्री अव्वल, दीपिकाचा नंबर कितवा?

रोज एक चमचा तूप खाल्ल्याने शरीरात होतात आश्चर्यकारक बदल, जाणून घ्या 5 फायदे

Mahila Bachat Gat: महिलांसाठी मोठी बातमी! सुरुवातीला ३० हजार अन् नंतर ६० हजार; बचत गटांसाठी सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT