Leftover Rice Recipe SAAM TV
लाईफस्टाईल

Leftover Rice Recipe : काय सांगता! भातापासून तयार केलं थालीपीठ; वाचा टेस्टी रेसिपी

Breakfast Recipe : अनेकांच्या घरी रात्री उरलेल्या भाताचा सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात बनवला जातो. पण रोज भात खाऊन कंटाळा आला असेल तर, उरलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्याला चमचमीत थालीपीठ बनवा.

Shreya Maskar

रात्रीच्या जेवणातील भात उरलेल्यास रोज फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर, नवीन खास पदार्थ जाणून घ्या. तुम्ही झटपट उरलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्याला थालीपीठ बनवू शकता. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि तुम्हाला नवीन पदार्थ देखील चाखायला मिळेल. सिंपल रेसिपी नोट करा.

सकाळच्या नाश्त्याला उरलेल्या भातापासून खमंग थालीपीठ बनवा

साहित्य

  • उरलेला भात

  • दही

  • गव्हाचे पीठ

  • हळद

  • मीठ

  • लाल तिखट मसाला

  • धणे पूड

  • ओवा

  • तेल

  • कोथिंबीर

  • मैदा

कृती

रात्री उरलेल्या भाताचे सकाळच्या नाश्त्याला थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम उरलेला शिळा भात घेऊन त्यात दही घालून छान कुस्करून घ्या. दही भातात संपूर्ण मुरल पाहिजे याची काळजी घ्या. आता या मिश्रणात गव्हाचे पीठ, मैदा , हळद, लाल तिखट मसाला, धणे पूड, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल घालून पाणी मिसळून कणीक मळून घ्यावी. आता याचे छोटे गोळे करून गोल थालीपीठ थापून घ्या. पॅनवर तेल टाकून थालीपीठ छान भाजून घ्या. पुदिन्याच्या चटणीसोबत याचा आस्वाद घ्या.

शिळ्या भाताचे फायदे

वजन कमी होते

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शिळा भात आवर्जून खा. कारण यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तसेच भरपूर फायबर देखील आढळते. शिळा भात खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर

शिळा भात खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे अन्न पचनास मदत करते. त्यामुळे तुम्ही मर्यादित स्वरूपात शिळा भात खाऊ शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT