Manasvi Choudhary
श्रावणातील दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन.
यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा सण १९ ऑगस्ट २०२४ ला आहे.
नारळी पौर्णिमेला नारळी भात नैवेद्य दाखवला जातो. याचनिमित्त घरी नारळी भात कसा बनवायचा हे जाणून घ्या
नारळी भात बनवण्यासाठी तांदूळ, गूळ, नारळाचा किस,गूळ, केशर, लवंग,मनुका, काजू, वेलची आणि तूप हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. कोरडे करून घ्या.
गॅसवर कढईत दोन चमचे तूप घाला. नंतर यात ड्रायफ्रुट्स सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. तुपातील ड्रायफ्रुट्स एका डिशमध्ये काढून घ्या.
कढईत तुपा घालून लवंग भाजून घ्या. आता यात धुतलेले तांदूळ घालून शिजवून घ्या. नंतर भातातील पाणी काढा नंतर यात केशर घाला.
गॅसवर एका पॅनमध्ये गूळ वितळल्यानंतर त्यात किसलेला खोबरा मिक्स करा. या तयार सारणमध्ये शिजवलेला भात व्यवस्थित परतून घ्या.
या भातामध्ये ड्रायफ्रुट्स मिक्स करून थोडे पाणी घालून शिजवून घ्या. अशाप्रकारे नारळी भात खाण्यासाठी तयार आहे.