लाईफस्टाईल

Tea Health : चहाप्रेमींनो सावधान! दुधाचा चहा करताना या ३ चुका टाळा; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा

Milk Tea Mistakes : चहा बनवताना नकळत केल्या जाणाऱ्या तीन चुका आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. दूध आधी टाकणे, चहा पुन्हा गरम करणे आणि प्लास्टिक गाळणी वापरणे या चुका टाळा.

Sakshi Sunil Jadhav

चहाप्रेमी बहुतेकजण दुधासोबत चहा घेतात. पण काही चुकीच्या सवयींमुळे हा चहा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

दररोज घेतला जाणारा चहा कधी कधी विषारी ठरतो.

चहा आरोग्यासाठी चांगला मानला जातो, पण तो योग्य पद्धतीने घेतल्यासच फायदेशीर ठरतो.

तज्ज्ञ सांगतात, दुधासोबत बनवलेला चहा चुकीच्या सवयींमुळे विषारी ठरतो आणि गंभीर आजारांचे कारण बनू शकतो.

भारतात बऱ्याच घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाच्या कपानेच होते. मात्र, चहा बनवताना नकळत काही चुकतात आणि त्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतात, असे पोषणतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. चहा चुकीच्या पद्धतीने बनवल्यास त्यातले पौष्टिक घटक नष्ट होतात आणि शरीरावर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता असते.

पहिली चुकीची पद्धत

चहा बनवताना आधी भांड्यात दूध तापवतात आणि चहा तयार करतात. परंतु ही पद्धत तुमच्या शरीरासाठी अयोग्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. दुधातील प्रथिने चहामधील अँटी-ऑक्सिडंट्सना बांधतात, ज्यामुळे ते शरीराला उपयोग न होता हानिकारक ठरू शकतात. योग्य पद्धतीनुसार सर्वप्रथम भांड्यात पाणी उकळावे, त्यानंतर चहाची पाने घालून उकळून घ्यावीत आणि शेवटी दूधाचा वापर करुन चहा तयार करावा. अशी पद्धत चहा अधिक सुरक्षित आणि पौष्टिक बनवते.

दुसरी चुकीची पद्धत

काही व्यक्तींना गरमा गरम चहा पिण्याची सवय असते. मात्र हा शरीरासाठी मोठा धोका मानला जातो. चहा पुन्हा गरम केल्यावर चहातील आम्लतेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे पोटाच्या तक्रारी, अपचन किंवा अॅसिडिटी होऊ शकते. म्हणूनच तयार केलेला चहा लगेच प्यावा, तो वारंवार गरम करू नये.

तिसरी चूक

तिसरी आणि सगळ्यात गंभीर चूक म्हणजे प्लास्टिकच्या गाळणीचा वापर. बऱ्याच घरांमध्ये सोयीप्रमाणे प्लास्टिक चाळणी वापरता. परंतु गरम चहा या गाळणीतून गाळला की त्यातील रसायने चहामध्ये मिसळतात. ही संयुगे शरीरात साचत जाऊन अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे तज्ज्ञांनी स्टील किंवा धातूची गाळणी वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चहा पिताना शरीराची काळजी घ्यायला विसरु नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT