Gujhia Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Gujhia Recipe : क्रिस्पी आणि सॉफ्ट गुजिया रेसिपी; 'या' टिप्सने बनवाल तर जबरदस्त स्वाद येईल

Tasty Gujiya Recipe : घरच्याघरी गुजिया कशी बनवतात? हे अनेक महिलांना माहिती नाही. त्यामुळे आज त्याचीच रेसिपी जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

गोड पदार्थ प्रत्येकाला आवडतात. काही व्यक्ती तर फार जास्त प्रमाणात गोड खातात. जेवणात किंवा जेवणानंतर काही व्यक्तींना गोड हवंच असतं. त्याशिवाय त्यांना जोवण झाल्यासारखं वाटत नाही. गोड पदार्थ खाण्यासाठी आता लगेचच दिवाळी सण देखील येत आहे. महाराष्ट्रात दिवाळीमध्ये गोड करंजी बनवली जाते. करंजी तुम्ही सर्वांनी खाल्लीच असेल. काही व्यक्तींना करंजी आवडत नाही. त्यामुळे आता त्यांच्यासाठी आम्ही करंजी सारखी एक खास रेसिपी आणली आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला गुजिया कशी बनवतात याची माहिती सांगणार आहोत.

साहित्य

२०० ग्रॅम खवा

१ वाटी पिठी साखर

काजू

बदाम

पिस्ता

अक्रोड

२ कप मैदा

मीठ चविनुसार

तेल तळण्यासाठी

कृती

गुजिया बनवताना सर्वात आधी एक पॅन गॅसवर तापण्यासाठी ठेवा. त्यानंतर यामध्ये सुका खवा टाकून घ्या. खवा गॅसवर छान भाजून घ्या. खवा मस्त रोस्ट झाला की एका पॅनमध्ये काढून घ्या. त्यानंतर यामध्ये एक वाटी पिठी साखर मिक्स करा. तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर जाड साखर तुम्ही मिक्सरला बारीक करून सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने यात पिठी साखर मिक्स करून घेऊ शकता.

त्यानंतर काजू, बदाम, अक्रोड आणि अन्य बाकीचे सर्व ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये तूप घेऊन त्यात हे रोस्ट करा. तसेच खव्याच्या मिश्रणात सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स करा. अशा पद्धतीने तयार झालं तुमचं सिंपल सारण.

पुढे एका वाटीत मैद्याचं पीठ घ्या. तसेच यात तेलाचे मोहन मिक्स करा.त्यानंतर पाणी टाकून मस्त कणीक मस्त मळून घ्या. कणीक मळून झाल्यावर करंजी बनवतात अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला गुजिया बनवायची आहे. गुजिया बनवून घेतल्यावर पुढे तेलात ती मस्त तळून घ्या. तळताना गॅस मीडिअम टू लो फ्लेमवर ठेवा. गॅस जास्त फास्ट ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रगती मंदावली! 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Kontoli Bhaji Recipe: पावसाळ्यात कंटोलीची भाजी खावीशी वाटतेय? लगेचच जाणून घ्या रेसिपी

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दरे गावाचा दौरा

Pune Firing: जिम मालकावर अल्पवयीन तरुणांकडून गोळीबार; २ तासांत आरोपी ताब्यात, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Diabetes : मधुमेही रुग्णांनी पावसाळ्यात तब्येतीची घ्या विशेष काळजी, 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात

SCROLL FOR NEXT