Siddhi Hande
चायनीज पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात.
चायनीजमध्ये मंच्युरियन भजी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण खातात.
मंच्युरियन बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी, कांद्याची पात, गाजर, शिमला मिरची एकदम बारीक चिरुन घ्यावी.
या भाज्यांमध्ये मैदा, लाल तिखट, काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट टाकावे.
या मिश्रणात आवश्यकतेनुसार मीठ टाकावे. मिश्रण चांगलं मिक्स करुन घ्या.
या मिश्रणाचे गोळे करुन ते तेलात तळून घ्या.
शेजवान चटणी बनवण्यासाठी लसूण बारीक चिरुन घ्या.
बारीक चिरलेला लसूण तेलात तळून घ्या. त्यानंतर त्यात मिरचीची पेस्ट आणि मीठ टाका.
ही शेजवान चटणी तुम्ही मंच्युरियनसोबत खाऊ शकतात.