Bath After Meal SAAM TV
लाईफस्टाईल

Bath After Meal: जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ करताय? सावधान! वाचा तज्ज्ञांचे मत

Health Tips : अनेकांना जेवल्यानंतर आंघोळ करायची सवय असते. त्यामुळे जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे आरोग्यासाठी योग्य की अयोग्य जाणून घ्या.

Shreya Maskar

आजकालच्या धावपळीच्या जगात खाण्यापिण्याचे, झोपण्याचे वेळापत्रक बदलले आहे. याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना पाहायला मिळतो. अनेक लोक जेवण झाल्यावर लगेच आंघोळ करतात. जे की चुकीचे आहे. कारण यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच अनेक शरीराच्या समस्या देखील उद्भवतात. जेवल्यानंतर आंघोळ करण्याची सवय तुमच्या जीवावर बेतू शकते.

शरीराला योग्य पोषण मिळण्यासाठी आपण जेवण करतो. मात्र जेवल्यावर आंघोळ केल्याने पचनासंबंधित समस्या उद्भवतात. जेवण केल्यानंतर आंघोळ करणे योग्य की अयोग्य हे आपण तज्ज्ञांकडूनच समजून घेऊयात. तसेच या दोन गोष्टींची वेळ बदलली तर आपल्या शरीराला कोणते नुकसान होते जाणून घ्या. कारण चांगल्या आरोग्यासाठी अन्नाचे पचन होणे सर्वात महत्त्वाचे आहे.

जेवण केल्यानंतर किती वेळाने आंघोळ करावे?

तज्ज्ञांचे मते,जेवण केल्यानंतर आंघोळ करणे आणि आंघोळ केल्यानंतर लगेच जेवण करणे या दोन्ही गोष्टी आरोग्यास हानिकारक आहेत. यामुळे ॲसिडीटी, उलटी, अपचन, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारखे समस्या उद्भवतात. तसेच लठ्ठपणाही वाढतो. सर्वात महत्त्वाचे जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ केली तर, शरीराचे तापमान कमी होऊन रक्ताभिसरण बिघडते. त्यामुळे कधीही जेवणाआधी अंघोळ केली पाहिजे. कारण आंघोळ केल्यानंतर आपल्या पेशींना ताकत मिळते आणि आपल्याला फ्रेश वाटते आणि आपल्याला चांगली भूक लागते. जर तुम्हाला जेवण केल्यानंतरच आंघोळ करायची असेल तर जेवल्यावर १ तासानंतर आंघोळ करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

SCROLL FOR NEXT