Lungs Cancer  Saam Tv
लाईफस्टाईल

Lung cancer: नखांमध्ये हे बदल दिसले तर समजा फुफ्फुसांचा कॅन्सर झालाय; काय आहेत लक्षणं वाचा

Lung cancer symptoms: फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे अनेकदा उशिरा दिसतात, पण काही संकेत बोटांमध्येही दिसू शकतात. फिंगर क्लबिंग आणि नखांमध्ये बदल हे धोक्याचे संकेत असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वाढतं प्रदूषण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. वाढत्या प्रदूषणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे फुफ्फुसांशी संबंधित आजार वाढताना दिसतायत. यामध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर हा सर्वात धोकादायक आजार मानला जातो. कारण या आजाराची लक्षणं अनेकदा उशिरा दिसून येतात. अनेकदा या आजाराचं निदान तो शरीरात पसरल्यावर होतं.

फुफ्फुसांचा कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांमध्ये निर्माण होणारी घातक गाठ. हा आजार श्वसनमार्गातील पेशींमध्ये डीएनएमध्ये झालेल्या बदलांमुळे सुरू होतो. या पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि ट्युमर तयार होतो. धूम्रपान हे याचं प्रमुख कारण मानलं जातं. या कॅन्सरची काही लक्षणं बोटांमध्ये दिसून येतात.

बोटांमध्ये दिसणारी लक्षणं

फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं फक्त श्वसनाशी संबंधित नसतात तर काही वेळा शरीराच्या इतर भागांवरही त्याचा परिणाम दिसतो. बोटांच्या टोकांमध्ये होणारे बदल हे याचं सुरुवातीचं संकेत ठरू शकतात.

फिंगर क्लबिंग

जर तुम्ही दोन्ही हातांच्या नखांना एकमेकांवर टेकवलं, तर मध्ये एक छोटा डायमंडसारखा प्रकाश दिसत असेलतर ते फिंगर क्लबिंगचं लक्षण असू शकतं. या अवस्थेत बोटांच्या टोकांमध्ये सूज येते.

नखांच्या मुळाजवळील भाग मऊ होणं

हा बदल तुमच्या नखांमध्ये हळूहळू होतो. सुरुवातीला नखांच्या मुळाजवळील भाग मऊ होऊ लागतो. त्यानंतर नखांच्या भोवतीची त्वचा चमकदार दिसू लागते. पुढे नखांचा आकार वाकलेला दिसतो आणि शेवटी बोटांच्या टोकांमध्ये सूज वाढते.

जर तुम्हाला तुमच्या हातावर ही लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

फुफ्फुसांच्या कॅन्सरची इतर लक्षणं

  • चेहरा किंवा मानेवर सूज येणं

  • सततचा खोकला

  • वारंवार छातीत इन्फेक्शन होणं

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • छाती किंवा खांद्यात वेदना

  • श्वास घेताना घरघर होणं

  • खोकल्यातून रक्त येणं

  • आवाज बसणं

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT