Surya Shukra Yuti 2023 in Kark  Saam tv
लाईफस्टाईल

Surya Shukra Yuti 2023 in Kark : कर्क राशीत सूर्य-शुक्र युती! राजभंग योग, या राशींचे नशीब फळफळणार; अचानक धनलाभ

Rajbhang Yog: सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगाने राजभंग योग निर्माण होईल.

कोमल दामुद्रे

Surya Shukra Yuti In Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. त्यामुळे अनेक राशींवर त्याचा वेगवेगळा प्रभाव पडतो. मागच्या महिन्यात कर्क राशीत सूर्य ग्रहाने प्रवेश केला होता.

अशातच आता 7 ऑगस्ट 2023 रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत कर्क राशीत राहील. दुसरीकडे 15 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत राहील. यामुळे कर्क राशीत सूर्य आणि शुक्राचा संयोग होईल. सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगाने राजभंग योग निर्माण होईल. या राजभंग योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. तर या 3 राशींनीहा काळ अचानक आर्थिक लाभ देईल. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी, ज्यांना सूर्य आणि शुक्राच्या संयोगाने फायदा होईल.

1. मेष:

सूर्य आणि शुक्राचा संयोग मेष राशीच्या लोकांना सर्व बाबतीत लाभ देईल. या लोकांच्या जीवनात भौतिक सुख वाढेल. तसेच उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीतून (Investment) चांगला नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये (Career) प्रगती करण्याच्या चांगल्या संधी मिळतील. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. वाहन-मालमत्ता खरेदी करू शकाल. आरोग्य चांगले राहील.

2. कर्क:

कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ सिद्ध होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात आवड व आदर वाढेल. करिअरमध्ये फायदा होईल. प्रतिष्ठा मिळण्याची आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. लाइफ पार्टनरसोबत (Partner) फिरायला जाऊ शकता.

3. तूळ :

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि या राशीच्या लोकांना जोरदार लाभ देईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकते. उच्च पद, मोठी वेतनवाढ मिळू शकते. सत्ता-सरकारकडून लाभ होऊ शकतो. अचानक मिळालेल्या पैशाने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय चांगला चालेल. कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT