Summer Travel Tips Google
लाईफस्टाईल

Summer Travel Tips: उन्हाळ्यात फिरायला जाताना या गोष्टी बॅगेत ठेवायला विसरु नका; ऐनवेळी सापडाल अडचणीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरी अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे अनेकजण फिरायला जाण्याचा प्लान करतात. अनेक लोक आठवड्यासाठी किंवा १५ दिवसांसाठी फिरायला जातात. जास्त दिवस फिरायला जाण्यासाठी सर्व गोष्टींचे अगदी योग्य प्लानिंग करायला हवे. फिरण्याच्या प्रत्येक गोष्टी त्यांना माहित असायला हवे. त्याचसोबत हॉटेल, राहण्याची सोय आधीच करायला हवी. ही सर्व करताना अनेकगा लोक पॅकिंग करताना बऱ्याच गोष्टी विसरतात. आज आम्ही तुम्हाला जास्त दिवसांच्या सुट्ट्यांसाठी जाताना कोणत्या गोष्टी घेऊन जायला हव्यात. याबाबत माहिती देणार आहोत.

कागदपत्रे

फिरायला जाताना नेहमी आपले आवश्यक कागदपत्रे स्वतः जवळ ठेवा. प्रवासाचे तिकीट, पासपोर्ट, पॅन कार्ड या गोष्टींचे झेरॉक्स आणि ओरिजनल कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा. या गोष्टींचा तुम्हाला प्रवासादरम्यान उपयोग होऊ शकतो.

टिश्यू पेपर किंवा फेस वाइप

उन्हाळ्यात तुम्ही तुमच्याजवळ वेट वाइप्स ठेवा. प्रवासादरम्यान चेहरा पुसण्यासाठी, जेवणानंतर हात पुसण्यासाठी वेट वाइप उपयोगी असतात. प्रवास करताना सर्वत्र पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे वेट वाइप्स उपयोगी ठरतात.

सनस्क्रिन

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनस्क्रिन लावून जाणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हामुळे चेहरा खूप जास्त टॅन होतो. त्यामुळे नेहमी बॅगेत सनस्क्रिन ठेवा. तोंड धुतल्यांनतर तुम्ही सनस्क्रिन वापरा. यामुळे तुमचा चेहरा टॅन होणार नाही.

ऑर्गनायझर

तुम्ही प्रवासाला जाताना ऑर्गनायझर नेहमी तुमच्यासोबत ठेवा. त्यात तुम्ही रोजच्या वापरातील गोष्टी म्हणजे टुथब्रश, पेपर साबण, फेस वॉश, लिप बाम, टिश्यू पेपर, मेकअप किट टेवू शकतात. ही बॅग तुम्ही नेहमी तुमच्याजवळ ठेवू शकतात.

सनग्लासेस

उन्हाळ्यात फिरायला जाताना सनग्लासेस नेहमी घेऊन जावे. उन्हाचा डोळ्यांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे सनग्लासेस सोबत ठेवा. त्याचसोबत पॉकेट फ्रेंडली परफ्यूमदेखील ठेवा.

टोपी

उन्हाळ्यात फिरायला जाताना नेहमी तुमच्याजवळ टोपी ठेवा. उन्हाने डोके प्रचंड तापते. त्यामुळे डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेर जाताना टोपी घेऊन जा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT