Summer Skin Care, Common Summer Skin Conditions
Summer Skin Care, Common Summer Skin Conditions Saam Tv
लाईफस्टाईल

Summer Skin Care : उन्हाळ्यात होणारे त्वचेचे विकार आणि त्यावरील उपचार

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

उन्हाळ्यात अनेक आजार उद्भवतात. त्यामध्ये सगळ्यात जास्त उद्भवतो तो त्वचेचा विकार. सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी सनस्क्रिन, टोनर्स, फेस पॅक, सीरम, फेशियल आणि क्लिन्सरचा वापर करतो.

बऱ्याचदा केमिकल उत्पादनांचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. यासाठी त्वचा (Skin) नैसर्गिक पद्धतीने हायड्रेट होणे गरजेचे आहे. वयाची तिशी ओलांडल्यानंतर महिलांमध्ये कोणते त्वचा विकार आढळून येतात याविषयी जाणून घेऊया मुंबईतील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ शरीफा चौसे यांच्याकडून

1. लाइकेन प्लानो पिग्मेंटोसस:

या स्थितीत, त्वचेच्या प्रभावित भागावर निळे-तपकिरी रंगाचे चट्टे पडतात. ही समस्या अचानक सुरू होते. हा त्वचारोग सामान्यतः तिशीनंतर उद्भवतो आणि त्यातही महिलांमध्ये (Women) याचे प्रमाण अधिक असते. चेहरा आणि मान आणि क्वचितच तोंडावर अशा प्रकारचा चट्टा आढळून येतो. यामागचे कारण अज्ञात आहे. मात्र काही ठराविक घटक जसे की मोहरीचे तेल, आवळ्याचे तेल, हेअर डाय, अत्तर आणि हिपॅटायटीस सी विषाणू संसर्गासारखे काही घटक पूर्वसूचना देणारे घटक म्हणून नोंदवले गेले आहेत. या स्थितीच्या विकासात सूर्यप्रकाशात जास्त प्रमाणात असणे देखील कारणीभूत ठरते.

2. पायोजेनिक ग्रॅन्युलोमा:

हा एक सौम्य रक्तवहिन्यासंबंधीचा ट्यूमर आहे. हे एकच लाल रंगाचे फोड असून त्याला स्पर्श करताच रक्तस्त्राव होतो, त्याची वाढ खूप जलद होते. हे महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान देखील होते (गर्भधारणेचा ग्रॅन्युलोमा) याचे नेमके कारण अज्ञात आहे. तथापि, असे काही अभ्यास सूचित करतात की आघात, संसर्ग, औषधे, कोणत्याही संवहनी विकृतीमुळे पायोजेनिक ग्रॅन्युलोमाचा विकास होतो.

3. सेबरोहोईक केराटोसिस:

यामध्ये त्वचेच्या वर थोडेसे फुगीर, काळ्या रंगाचे खडबडीत चट्टे असतात. हा प्रौढ आणि वयोवृद्धांमध्ये आढळणारा त्वचेसंबंधीत विकार आहे. त्यांची वाढ मंद गतीने होते परंतु कालांतराने त्यांची जाडी वाढते. ही एक सौम्य स्थिती असल्याने कोणत्याही उपचारांची आवश्यकता नाही परंतु या जखमांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

4. एरिथ्रोपोएटिक प्रोटोपोर्फेरिया (EPP):

हा एक दुर्मिळ अनुवंशिक विकार आहे ज्यामुळे प्रकाश संवेदनशीलता निर्माण होते. ईपीपी असलेल्या रुग्णांना सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर तीव्र वेदना आणि जळजळ होते, त्यामुळे या व्यक्तींना सुर्यप्रकाशात बाहेर पडणे त्रासदायक ठरते

5. उपचार:

त्वचेच्या रोगांवर उपचार करण्यासाठी त्याची लक्षणे आधी जाणून घ्या. वैद्यकिय सल्ल्याने उपचार पर्याय निवडा. स्वत:च्या मर्जीने औषधे घेणे टाळा. त्वचा विकाराचे वेळीच व्यवस्थापन करुन निरोगी त्वचेकरिता आवश्यक ती काळजी घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : Manoj Jarange: साताऱ्यातील पाटण तालुक्यात वादळी पाऊस

Washim Zilha Parishad : सरकारी विहिरीतून पाण्याची चोरी; सीईओंकडून कारवाई

Rohit Sharma vs Hardik Pandya: रोहित पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार? मात्र या खेळाडूंकडून होतोय विरोध

Instagram Viral Video: अरे बापरे! भररस्त्यात अवतरली मंजुलिका, तरूणीचा खतरनाक डान्स VIDEO व्हायरल

Stone Ring: बोटात रत्नाची अंगठी घालण्यापूर्वी ह्या गोष्टी माहित आहेत काय़ ?

SCROLL FOR NEXT