Summer Hair Care
Summer Hair Care Saam Tv
लाईफस्टाईल

Summer Hair Care : उन्हाळ्यात केस चिकट होतात, तुटतात? कशी घ्याल काळजी? या सोप्या टिप्स फॉलो करा

कोमल दामुद्रे

Hair Care Tips :

उन्हाळा आला की, आपण जितकी आरोग्याची काळजी घेतो तितकेच केसांकडेही लक्ष द्यायला हवे. उन्हामुळे आपल्याला त्वचेचे अधिक नुकसान होते. त्यामुळे केसांचीही मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसून आली.

उन्हाळ्यात (Summer Season) अनेक महिलांना (Women) केसगळतीची समस्या सुरु होते. बदलते हवामान, वातावरण आणि प्रदूषण यामुळे टाळूमध्ये अनेक समस्या होतात. ज्यामुळे केसगळती होते.

ज्याप्रमाणे चेहऱ्यावर घामामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे पुरळ येण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे टाळूलाही घाम येतो आणि त्यामुळे केसांची (Hair) क्युटिकल्स बंद होतात. यामुळे केसगळती होते. यासाठी टाळूच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यायला हवे. केसांची काळजी कशी घ्यायची पाहूया

1. केस धुणे

उन्हाळ्यात केसात घाम अधिक प्रमाणात साचतो. यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा केस स्वच्छ धुवा. केसांच्या पोतनुसार शाम्पू निवडा. तसेच केसांसाठी आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करा.

2. केस कंडिशनिंग

केस धुतल्यानंतर त्याला चांगले कंडिशनर लावावे. ज्यामुळे केसांना हायड्रेट आणि मॉइश्चरायझ होण्यास मदत मिळते. केसांना कंडिशनर करण्यासाठी तुम्ही हेअर मास्कचा वापर करु शकता. कोरफड जेल आणि गुलाब पाणी यांची मदत घेऊ शकता.

3. टाळूची मालिश

शरीरात रक्ताभिसण सुरळीत होणे गरजेचे आहे. टाळूची मालिश करत रहावी. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना फायदा होतो. यासाठी केसांना खोबऱ्याच्या तेलाने मालिश करावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | नवनीत राणांचा ओवेसींवर पुन्हा हल्ला!

Raj Thackeray | राज ठाकरेंनी काढला फतवा!

Chhatrapati Sambhajinagar News | संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीत हायवोल्टेज राडा

Nashik Constituency | लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी?

Maharashtra Politics: दादांची दमबाजी, सुप्रियाताईंची ढाल; निलेश लंकेसाठी सुळेंनी घेतला अजित पवारांशी पंगा, VIDEO

SCROLL FOR NEXT