Food For Hair, Hair Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Food For Hair : या पोषकत्त्वांच्या कमतरतेमुळे पडू शकते टक्कल, केसांची काळजी घेण्यासाठी हे पदार्थ खा

Hair Care Tips : लांबसडक, काळेभोर केस कुणाला आवडत नाही. केसांमुळे आपले सौंदर्य अधिक सुंदर दिसते. आपले केस निरोगी आणि सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. केस लांब आणि दाट होण्यासाठी आपण अनेक केमिकल उत्पादनांचा वापर करतो.

कोमल दामुद्रे

How To Prevent Hair Falls :

लांबसडक, काळेभोर केस कुणाला आवडत नाही. केसांमुळे आपले सौंदर्य अधिक सुंदर दिसते. आपले केस निरोगी आणि सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. केस लांब आणि दाट होण्यासाठी आपण अनेक केमिकल उत्पादनांचा वापर करतो.

परंतु, केस (Hair) वाढण्यासाठी अधिक गरज असते ती, पोषणाची. पोषणाच्या कमतरतेमुळे केस तुटणे आणि गळण्याची समस्या अधिक वाढते. केसांच्या संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी आहारात (Food) कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा जाणून घेऊया.

1. बायोटिन

बायोटिन हे केसांसाठी महत्त्वाचे पोषक आहे. यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) बी असून याच्या कमरतेमुळे केस कमकुवत होतात आणि तुटायला लागतात. केसांच्या वाढीसाठी ते अधिक आवश्यक आहे. याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात बदाम, ट्यूना, सॅल्मन, रताळे इत्यादींचा समावेश करा.

2. व्हिटॅमिन ई

केसांच्या पोषण आणि वाढीसाठी व्हिटॅमिन ई जास्त गरजेचे आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असते. यामुळे केसांना सूर्यप्रकाशापासून नुकसान होण्यापासून वाचवू शकते. याच्या कमतरतेमुळे केस गळणे आणि कोरडे होण्याची समस्या उद्भवू शकते. यासाठी आहारात पालक, बदाम, एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईलचा समावेश करा.

3. ओमेगा - ३ फॅटी ऍसिड

ओमेगा - ३ फॅटी ऍसिड हे केस आणि टाळूला हायड्रेट ठेवतात. त्याच्या कमतरतेमुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. तसेच टाळू कोरडी देखील होऊ शकते. ज्यामुळे कोंडा किंवा टाळूच्या संसर्गाची समस्या उद्भवू शकते. यासाठी आहारात अक्रोड, एवोकॅडो, बदाम आणि फॅटी फिश जसे ट्यूना, सॅल्मन इत्यादींचा समावेश करा.

4. जस्त

केसांना निरोगी ठेवण्यासाठी झिंक खूप आवश्यक आहे. झिंकच्या कमतरतेमुळे केस कोरडे आणि रखरखीत होतात. हे केसांच्या कूपांना निरोगी ठेवते. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. यासाठी आहारात नट, बीन्स, मांस, अंडी, बिया इत्यादींचा आहारात समावेश करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: स्वातंत्र्यदिनी सोन्याचे दर ११०० रुपयांनी घसरले,२४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा तडाखा, नदी-नाल्यांना पूर; रस्ते वाहतूक ठप्प, शेती पाण्याखाली

Maharashtra Live Update: उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण

Kalyan Protest: मासविक्री बंदीविरोधात खाटिक समाज आक्रमक, KDMC समोर कोंबड्या घेऊन आंदोलन; पाहा VIDEO

Janmashtami 2025 : जन्माष्टमीच्या दिवशी घरात या वस्तु ठेवल्यास येऊ शकते नकारात्मकता

SCROLL FOR NEXT