The Disadvantage of Eating Cucumber (Kakdi) in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Cucumber Side Effects: रखरखत्या उन्हात काकडीचे अतिप्रमाणात सेवन करताय? आरोग्यावर होणारे दुष्परिणामही जाणून घ्या

Kakdi Khanycha Nuksan: उन्हाळ्यात आपल्याला बाजारात काकडी सर्वत्र पाहायला मिळते. याचा आपण आहारात समावेश केल्याने उन्हापासून तसेच डिहाड्रेशनच्या समस्येपासून आराम मिळतो.

कोमल दामुद्रे

काकडी खाण्यामुळे होणारे नुकसान:

उन्हाळ्यात आपल्याला बाजारात काकडी सर्वत्र पाहायला मिळते. याचा आपण आहारात समावेश केल्याने उन्हापासून तसेच डिहाड्रेशनच्या समस्येपासून आराम मिळतो. काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, के, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारख्या पोषकतत्वांचा समावेश असतो.

उन्हाळ्याच्या (Summer Season) दिवसांत निरोगी राहाणे आणि शरीराचा उष्माघातापासून बचाव करणे आवश्यक असते. काकडीचे जेवढे आरोग्याला फायदे (Benefits) आहेत तितकेच नुकसान (Side Effects) देखील. याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करु नका. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. हायपरक्लेमिया

काकडीत पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हायपरक्लेमिया सारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे किडनीसह गॅस, ऍसिडीटी, पेटके येऊ शकतात.

2. डिहायड्रेशन

काकडीच्या बियांमध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळून येते. यामध्ये क्युकरबिटिन नावाचे संयुग देखील जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे याचे जास्त सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता देखील होऊ शकते. ज्यामुळे डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागेल.

3. बद्धकोष्ठता

तुम्हाला आहारात काकडी पचच नसेल किंवा रात्री तुम्ही याचे सेवन करत असाल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. काकडी सहज पचत नाही. झोपण्यापूर्वी याचे सेवन करु नका.

4. सायनसचा त्रास

काकडी थंडगार आहे. बदलत्या हवामानात तुम्हाला खोकला, सर्दी किंवा घसा खवखवणे किंवा कफ याचा त्रास होत असेल तर याचे सेवन टाळा. यामुळे याचे सेवन करणे टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT