Cucumber Benefits : दिवसाला १ काकडी खा, अनेक आजार दूर पळवा

कोमल दामुद्रे

काकडी

उन्हाळ्यात शरीराला गारवा देण्यासाठी काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

काकडीचे फायदे

काकडी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घेऊया त्याबद्दल

डिटॉक्स

काकडीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात असतात. हे खाल्ल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू लागतात.

सलाद

उन्हाळ्यात आरोग्यासाठी काकडी रामबाण औषध आहे. त्यासाठी सलाद म्हणून आहारात खाऊ शकता.

रक्तदाब कमी होतो

काकडीत पोटॅशियम आणि फायबर असते. हे खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. तसेच हृदयाच्या संबंधित समस्या दूर होतात.

वाढलेल्या वजनावर

वजन वाढण्याच्या समस्येवर काकडी खाल्ल्यास फायदा होतो. यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते.

डोळ्यांसाठी फायदेशीर

उष्णतेमुळे डोळ्यांची आग होते. त्यामुळे काकडीचा तुकडा १० ते १५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. डोळे निरोगी राहातील.

त्वचेसाठी बहुगुणी

जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल तर काकडी खा. यामुळे हायड्रेट राहण्यास मदत होईल.

Next : तांदळाच्या पाण्याचा आरोग्याला कसा होतो फायदा?

Rice Water Benefits | Saam Tv