कोमल दामुद्रे
उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला शरीराला गारवा देतील अशा पदार्थांचे सेवन करायला हवे.
या ऋतूमध्ये आपल्याला बाजारात काकडी हमखास पाहायला मिळते. काकडीपासून अनेक पदार्थ बनवले जातात.
उन्हाळ्यात पचनाच्या समस्या होत असतील तर काकडीचा रायता बनवून खाऊ शकता पाहूया रेसिपी
दही - १/४ कप, काकडी-१, शेंगदाण्याचा कूट - १ चमचा, साखर- १ चमचा, डाळींबाचे दाणे - १ते २ चमचे आणि कोथिंबीर
सर्वात आधी काकडी धुवून तिचे साल काढून घ्या. नंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्या. दही चांगले फेटून त्यात साखर मिक्स करा.
फेटलेल्या दह्यामध्ये किसलेली काकडी, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि डाळिंबाचे दाणे घाला.
व्यवस्थित मिक्स करुन सर्व्ह करा काकडीचा रायता