Water retention saam tv
लाईफस्टाईल

Water retention: अचानक वाढतंय वजन आणि फुगतंय पोट? शरीरात पाणी साठण्याच्या धोकादायक लक्षणांकडे वेळीच द्या लक्ष

Why Does Fluid Build Up Around The Heart And Abdomen: पोटात किंवा हृदयाभोवती पाणी साठणे हे लिव्हर, हृदय किंवा किडनीच्या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. पोट फुगणे, वजन वाढणे, धाप लागणे किंवा छातीत दुखणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

ज्याप्रमाणे डिहायड्रेशन धोकादायक असत त्याचप्रमाणे शरीराच्या काही भागांमध्ये अतिरिक्त पाणी साठणं देखील तितकंच धोकादायक असू शकतं. लोक अनेकदा अचानक पोट फुगणं किंवा धाप लागणं याला एक किरकोळ समस्या समजतात. परंतु हे देखील शरीरात पाणी साठल्याचं लक्षण असू शकतं. डॉक्टरांच्या मते, पोट आणि हृदयाभोवती पाणी साठणं हे गंभीर आरोग्य समस्यांचं लक्षण असू शकतं, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणं ठरू शकतं.

पोटात पाणी साठण्याचा त्रास कोणाला होतो?

क्लीव्हलँड क्लिनिक वेबसाईटच्या माहितीनुसार, पोटात पाणी साठण्याच्या स्थितीला 'ॲसाइटिस' (ascites) म्हणतात. ही स्थिती सामान्यतः लिव्हर सिरोसिस असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येते. ज्यावेळी लिव्हर खराब होऊ लागतं त्यावेळी शरीरातील मीठ आणि पाण्याचं संतुलन बिघडतं. अशावेली हळूहळू, पोटात पाणी जमा होऊ लागतं, ज्यामुळे पोटाचा आकारही नेहमीपेक्षा मोठा दिसतो. या लक्षणांमध्ये वेगाने वजन वाढणं, घोट्यांना सूज येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, पोटदुखी आणि थकवा यांचाही समावेश असू शकतो.

काय आहेत याची कारणं?

डॉक्टरांच्या मते, काही रोजच्या सवयींमुळे हा धोका वाढू शकतो. अति मद्यपान करणे, हिपॅटायटीस बी आणि सी सारख्या आजारांवर वेळेवर उपचार न करणं आणि लिव्हरच्या आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष करणे यामुळे सिरोसिस होऊ शकतो आणि परिणामी पोटात पाणी साठू शकतं. संशोधनात असंही आढळून आलंय की, यकृताचे गंभीर आजार हे एसाइटिसच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत.

हृदयात पाणी भरणं किती धोकादायक?

हृदयाजवळ पाणी जमा होण्याच्या स्थितीला पेरिकार्डियल इफ्युजन म्हणतात. हृदयाभोवतीच्या भागात अतिरिक्त द्रव जमा झाल्यावर हे घडतं. सुरुवातीला याची लक्षणं सौम्य असू शकतात परंतु जसजशी समस्या वाढत जाते तसतसं छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं, हृदयाचे ठोके वाढणं, चक्कर येणं आणि तीव्र अशक्तपणा जाणवू शकतो.

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, इन्फेक्शनवर उपचार करण्यास विलंब करणं, गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करणं आणि हृदय, किडनी किंवा लिव्हरशी संबंधित समस्यांवर वेळेवर उपचार न घेणं यामुळे पेरिकार्डियल इफ्युजनचा धोका वाढू शकतो. काही प्रकरणांमध्ये, ही स्थिती जीवघेणी देखील ठरू शकते.

कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये?

डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला पोटाचा आकार वाढणं, अचानक वजन वाढणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा छातीत सतत दुखणं यांसारखी लक्षणं आढळल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. लवकर निदान आणि उपचारांमुळे ही समस्या गंभीर होण्यापासून टाळता येऊ शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Money Plant : चोरलेला मनी प्लांट श्रीमंत बनवतो? सत्य ऐकून धक्का बसेल!

Maharashtra News Live Update: पुण्यातील घोरपडी भागात एक मोठं झाड ७ ते ८ घरांवर कोसळलं

Crime : अकलूजमध्ये खळबळबळ! भरदिवसा त्याने महिलेवर धाडधाड गोळ्या झाडल्या, जागीच मृत्यू

पावसाळ्यात खा गरमा गरम क्रिस्पी केळ्याचे वडे; घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी

School Holiday: पावसाचा ‘रेड अलर्ट’; पालघरमधील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

SCROLL FOR NEXT