Hip Replacements Saam Tv
लाईफस्टाईल

Hip Replacements : हिप रिप्लेसमेंटची यशस्वी सर्जरी, रुग्णाने तंदुरुस्त झाल्यावर स्विमींग पुलमध्ये मारली ब्लॅकफ्लिप

Hip joint replacement : डॉ. कुणाल माखिजा यांनी यशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hip Replacement Surgery :

अॅव्हॅस्कुलर नेक्रोसिस ऑफ द फेमोरल हेड (एव्हीएन) नितंबाचे हाड कमकुवत झालेल्या तसेच लठ्ठपणाने(१३८ किलो वजन) ग्रस्त असलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीवर डॉ. कुणाल माखिजा(जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, मुंबई) यांनी यशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली.

यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण श्री राकेश कनायलाल चिचरिया यांनी स्विमिंग पूलमध्ये बॅकफ्लिप्स मारत शरीराने पुर्वीसारखीच साथ दिल्याचा आनंद साजरा केला. उल्हासनगर येथील रहिवासी श्री राकेश कनायलाल चिचरिया (३९ वर्षे) हे व्यवसायाने दुकानदार असून मागील २ वर्षांपासून उजव्या नितंबाच्या वेदनाशी झुंज देत होते, ज्यामुळे त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या.

त्यांनी मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध डॉक्टरांचा सल्ला घेतला, ज्यांनी त्यांना शस्त्रक्रियेचा विचार करण्यापूर्वी वजन कमी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी आयुर्वेदिक उपाय करून पाहिले, पण त्यांना काही आराम मिळाला नाही.

३ महिने डाएट (Diet) केल्यानंतर त्याचे वजन १२२ किलोपर्यंत कमी झाले मात्र त्यात सातत्य राखता न आल्याने पुन्हा त्याने १३८ किलो पर्यंत वजनाची पातळी गाठली. त्यानंतर अॅव्हॅस्कुलर नेक्रोसिस ऑफ द फेमोरल हेड (एव्हीएन) निदान झाले. त्यासाठी त्यांनी पुढील उपचारासाठी डॉ. माखिजा यांच्याकडे जाऊन एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नितंबाच्या दुखण्यापासून त्यांची सुटका झाली. जिने चढणे आणि चालण्यासारख्या अशा एकेकाळी अवघड वाटणाऱ्या क्रिया त्याच्यासाठी सोप्या झाल्या.

डॉ. कुणाल मखिजा, वरिष्ठ जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन सांगतात की, अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, अॅव्हॅस्कुलर नेक्रोसिस सामान्यतः जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ रूग्णांमधील मांडीच्या हाडांवर परिणाम करते. लठ्ठपणामुळे नितंबांसह विविध सांध्यांवर जास्त ताण येतो.

प्रत्येकवेळी पाऊल उचलताना सांध्यावर ताण येतो. कालांतराने साध्यांना भार सहन न झाल्याने त्यांचे नुकसान होते. संशोधकांनी असे शोधून काढले आहे की लठ्ठ व्यक्तींमध्ये चरबी जमा झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात ज्यामुळे अॅव्हॅस्कुलर नेक्रोसिस सारखी समस्या निर्माण होते.

रक्तपुरवठ्यात व्यत्यय आल्याने हाडांची (Bones) झीज होते आणि परिणामी प्रभावित व्यक्तींना वेदना आणि हालचालींवर मर्यादा येतात. काही प्रकरणांमध्ये औषधोपचार आणि किरकोळ शस्त्रक्रिया प्रभावी ठरतात परंतु गंभीर प्रकरणांमध्ये संपूर्ण हिप रिप्लेसमेंट हा एकमेव उपाय शिल्लक राहतो.

डॉ. कुणाल माखिजा( जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन ) सांगतात की दीर्घकाळापर्यंत वेदनांचा सामना केल्यानंतर रुग्णाची हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. लठ्ठपणामुळे शस्त्रक्रियेदरम्यान विविध आव्हानांना सामोरे जावे लागले. रुग्णाच्या उच्च बीएमआयमुळे लांब सुई वापरून ऍनेस्थेसिया देताना विशिष्ट खबरदारी घेतली गेली. बॉल आणि सॉकेटने बनलेला हिप जॉइंट पूर्णपणे सिरेमिक इम्प्लांटने बदलण्यात आला होता आणि डॉ.तरन्नुम पांडे यांनी भूलतज्ज्ञ म्हणून मदत केली होती.

शस्त्रक्रियेनंतर राकेश लवकर बरा झाला शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांत तो चालण्यास आणि शौचालयाचा वापर करु लागला. अवघ्या 15 दिवसात रुग्णाने पुर्ववत हलचाली तसेच दैनंदिन कामांना सुरुवात केली. त्याने शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी सुरु केली. शस्त्रक्रिया होऊन आता तीन महिने झाले आहेत आणि तो आता बाईक चालवणे, कार चालवणे आणि पोहणे या सर्वच शारीरिक क्रिया सहजपणे करत असल्याचे डॉ मखिजा यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT