Tips For Success Saam TV
लाईफस्टाईल

Tips For Success : सक्सेसचं रहस्य उलगडलं; सकाळी ७ च्या आधी करा 'ही' कामं, आयुष्यात यशस्वी व्हाल

Morning Habits For Successful Life : कामात छान मन लागावं यासाठी झोप पूर्ण होऊन पहाटे लवकर उठता यायला हवं. त्यानंतर सकाळची सुरुवात इतकी छान असायला हवी की आपला संपूर्ण दिवस आनंदात गेला पाहिजे.

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात विविध कामे करून सक्सेस मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. त्यासाठी दिवसभर मेहनत घेऊनही अनेक व्यक्ती त्या कामात कुठेतरी कमी पडतात आणि त्यामुळे त्यांना हवं तसं यश मिळत नाही. हातात आलेल्या गोष्टी अचानक सुटून जातात.

आयुष्यात आपल्या कामात आणि विविध गोष्टींमध्ये मेहनत घेत असताना काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं. कामात छान मन लागावं यासाठी झोप पूर्ण होऊन पहाटे लवकर उठता यायला हवं. त्यानंतर सकाळची सुरुवात इतकी छान असायला हवी की आपला संपूर्ण दिवस आनंदात गेला पाहिजे.

सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या

आपण रात्री ७ ते ८ तास झोपतो. झोपेत असताना आपण पाणी पित नाही. म्हणजे तब्बल ७ ते ८ तास आपल्या शरीराराला जास्तीचं पाणी मिळालेलं नसतं. त्यामुळे बॉडी डिहायड्रेट होत असते. शरीर हायड्रेट करण्यासाठी सकाळी उठल्यावर सर्वात आधी पाणी प्यायलं पाहिजे. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने आपल्याला वजन कमी करण्यासही मदत होते.

फोन वापरू नका

सकाळी उठल्यावर बराच वेळ आपले डोळे बंद राहिल्यानंतर उघडलेले असतात. त्यामुळे सकाळी डोळे उघडल्यावर लगेचच फोन वापरू नका. अगदी २ तास तरी फोनला हात लावू नका. स्मार्ट फोनच्या रेडीएशनचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.

मेडिटेशन करा

सकाळीच मूड चांगला असावा यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं असतं. मेडिटेशन केल्याने संपूर्ण दिवस आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास आपल्याला मदत होते.

व्यायाम किंवा योगा करा

सकाळी स्नायूंची हालचाल होणंही गरजेचं असतं. त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या पाणी पिल्यानंतर व्यायाम करण्यास सुरुवात करा. व्यायाम केल्याने आखडलेले स्नायू मोकळे होतात आणि शरीरात उर्जा निर्माण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT