Ghazal Alagh Success Story: 9000 कोंटींची उलाढाल असलेल्या कंपनीची Co Founder गजल अलघने सांगितले यशामागचे 5 सिक्रेट्स

Mama Earth Founder Ghazal Alagh's Success Story: गजल अलघने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गजलने आपल्या यशामागचे काही सिक्रेट्स सांगितल्या आहेत. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ghazal Alagh Success Story: 9000 कोंटींची उलाढाल असलेल्या कंपनीची Co Founder  गजल अलघने सांगितले यशामागचे 5 सिक्रेट्स
Success Story Mama Earth Co-Founder Ghazal Alagh in MarathiSaam TV
Published On

गजल अलघ हे नाव सध्या देशातील प्रसिद्ध उद्योजिका महिलांमध्ये घेतले जाते. गजल अलघ ही आई आणि बाळासाठी सुरक्षित, नैसर्गिक आणि पर्यावरणास अनुकूल असे उत्पादने तयार करणारी प्रसिद्ध कंपनी Mamaearth ची सीईओ आणि सह-संस्थापक आहे. Mamaearth ही सध्या देशातील नामांकित कंपनी आहे. या कंपनीची उत्पादने मोठ्या प्रमाणात वापरली जातात. गजल अलघच्या यशाची कहाणी खूपच जबरदस्त आहे. तिने खूप मेहनत करत Mamaearth कंपनीची स्थापना केली. गजल अलघने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या यशामागचे सिक्रेट्स सांगितले आहेत. आज आपण गजल अलघच्या यशाबद्दल, तिच्या करिअरबद्दल, शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत...

Ghazal Alagh Success Story: 9000 कोंटींची उलाढाल असलेल्या कंपनीची Co Founder  गजल अलघने सांगितले यशामागचे 5 सिक्रेट्स
Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

गजलच्या यशामागचे सिक्रेट्स -

गजल अलघने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गजलने आपल्या यशामागचे काही सिक्रेट्स सांगितल्या आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिले की, 'इतरांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न थांबवा. आपली शर्यत फक्त स्वतःशीच आहे. तुम्ही काल होता त्यापेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न करा. सर्वात आधी तुमच्या स्वतःच्या शंका आणि असुरक्षितता दूर करा. जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वीच्या स्वतःशी खरोखरच स्पर्धा करत असता तेव्हाच तुमच्यामध्ये विकास होतो. तसंच, बेंचमार्क कोणी इतर नाही तर तो सतत तुमच्या स्वत:चा स्तर वाढवत असतो.'

गजलची नवी पोस्ट-

चंदीगडमध्ये राहणाऱ्या गजल अलघने २०१६ मध्ये पती वरुण अलघसोबत नवी दिल्ली येथे मामाअर्थ नावाची कंपनी सुरू केली. गजल अलघ ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स खूप आहेत. आपल्या फॉलोअर्ससोबत ती तिचे विचार शेअर करताना दिसते. अलघने अनेक स्वप्नांच्या अपयशासाठी अतिविश्लेषण किंवा अतिविचार करण्याच्या सवयीला दोषी मानले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, 'तुम्ही हजारो अंतर्गत बैठकींपेक्षा एका ग्राहक संभाषणातून अधिक शिकू शकाल. तुम्ही जितक्या लवकर शिपमेंट कराल तितक्या लवकर तुम्हाला कळेल की तुम्ही योग्य मार्गावर आहात की नाही.' तसंच, 'उद्योजक वापरकर्त्यांना जीवन, यश आणि शिक्षण यावरील त्याच्या मौल्यवान पोस्ट्समध्ये गुंतवून ठेवतो.', असे देखील अलघने सांगितले.

Ghazal Alagh Success Story: 9000 कोंटींची उलाढाल असलेल्या कंपनीची Co Founder  गजल अलघने सांगितले यशामागचे 5 सिक्रेट्स
Bathwater: प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच अंघोळीचे पाणी विकले; कंपनीने ठोठावला ९०,००० डॉलरचा दंड

गजलचे शिक्षण -

गजल अलघचा जन्म २ सप्टेंबर १९८८ मध्ये चंदीगडमध्ये झाला. गजलचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तिच्या वडिलांचे नाव कैलाश साहनी आणि आईचे नाव सुनीता साहनी असे आहे. गजलला चिराग साहनी नावाचा भाऊ आणि साहिबा चौहान नावाची बहीण आहे. गजल अलघने २०१० मध्ये पंजाब विदयापीठातून कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली. २०१३ मध्ये तिने डिझाइन आणि अप्लाइड आर्ट्समध्ये मॉडर्न आर्टमध्ये समर इंटर्नशिप कोर्स केला. त्याचवर्षी, गजलने न्यूयॉर्क अकादमी ऑफ आर्टमध्ये फिगरेटिव्ह आर्टचे शिक्षण घेतले. दरम्यान, २०११ मध्ये गजलने वरुण अलघसोबत लग्न केले.

गजलचे करिअर -

गजल अलघने कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. २००८ ते २०१० पर्यंत शिक्षण घेत असताना गझलने NIIT लिमिटेड, चंदीगड येथे काम केले. २०१२ मध्ये तिने एक वेबसाइट सुरू केली. ज्याद्वारे गजल लोकांना वय आणि वजनानुसार डाएट प्लान देत होती. कलेची आवड असलेल्या गजल अलखने तिच्या कलाकृती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित केल्या आणि देशातील टॉप १० महिला कलाकारांमध्ये तिच्या नावाचा समावेश झाला.

Ghazal Alagh Success Story: 9000 कोंटींची उलाढाल असलेल्या कंपनीची Co Founder  गजल अलघने सांगितले यशामागचे 5 सिक्रेट्स
Madhya Pradesh News : बापरे! मध्य प्रदेशमध्येही सापडला पैशांचा ढिगारा, नोटांची बंडलं बघून पोलीसही चक्रावले

Mamaearth कंपनीची स्थापना -

गजल अलघने पती विरुण अलघ यांच्यासोबत 'Mamaearth' नावाची कंपनी सुरू केली. त्यांना कंपनीची आणि उत्पादनाची कल्पना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर सुचली. जेव्हा तिने आपल्या मुलासाठी रसायनमुक्त उत्पादने शोधण्यास सुरूवात केली. तेव्हा तिला भारतात असे कोणतेही उत्पादने सहज मिळाली नाहीत. बाळ आणि मातांसाठी या उत्पादनाची गरज लक्षात घेऊन तिने कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आई आणि बाळासाठी सुरक्षित, नैसर्गिक आणि पर्यावरणास अनुकूल अशा उत्पादनांसाठी एक ब्रँड म्हणून सुरुवात केली. पाच वर्षांत तिच्या कंपनीचे ५०० शहरांमध्ये पाच दशलक्षाहून अधिक ग्राहक होते.

Ghazal Alagh Success Story: 9000 कोंटींची उलाढाल असलेल्या कंपनीची Co Founder  गजल अलघने सांगितले यशामागचे 5 सिक्रेट्स
EAC-PM Report : लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकसंख्येच्या अहवालावरून राजकारण तापलं; रिपोर्टमध्ये नेमकं आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com