EAC-PM Report : लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकसंख्येच्या अहवालावरून राजकारण तापलं; रिपोर्टमध्ये नेमकं आहे तरी काय?

EAC-PM report latest news :या अहवालात १९५० ते २०१५ सालादरम्यान हिंदू धर्मियांची संख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम धर्मियांची संख्या ६५ वर्षांमध्ये ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे.
EAC-PM Report
EAC-PM ReportSaam tv

नवी दिल्ली : देशातील १५ राज्यांमध्ये लोकसभा निवडणूक पूर्ण झाली आहे. देशातील निवडणुकींचे ४ टप्प्यांमधील २६० मतदारसंघात मतदान प्रक्रिया बाकी आहे. याचदरम्यान पंतप्रधानांच्या समितीने देशातील धार्मिक लोकसंख्येनुसार अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात १९५० ते २०१५ सालादरम्यान हिंदू धर्मियांची संख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम धर्मियांची संख्या ६५ वर्षांमध्ये ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे. तर ख्रिश्ननांची संख्या ५.३८ टक्क्यांनी वाढली आहे. तर शीख नागरिकांची संख्या देखील ६.५८ टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालावरून राजकीय वातावरण तापलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अहवालावर नजर टाकली, रिपोर्टनुसार, १९५० साली भारताची लोकसंख्या १०० टक्के होती, तर हिंदूची लोकसंख्या ८४.६८ टक्के होती. मुस्लीमांची संख्या ९.४८ टक्के होती. त्यानंतर २०१५ मध्ये भारताची लोकसंख्या १०० टक्के आहे, त्यात हिंदूची संख्या ७८.०६ टक्के होती. तर मुस्लिमांची लोकसंख्या १४.०९ इतकी झाली. या आधारावरून गेल्या काही वर्षांत भारतात बहुसंख्यांकांची लोकसख्या घटली आहे. तर अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढली आहे.

EAC-PM Report
Breaking News: इराणच्या ताब्यातून ५ भारतीय खलाशांची सुटका; भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

भाजपची काँग्रेसवर टीका

देशात मागील काही वर्षांत अल्पसंख्यांकांची संख्या वाढली आहे. यावरून सत्ताधारी नेत्यांनी काँग्रेसला कारणीभूत ठरवत टीका केली आहे. तर २०२१ सालची जनगणना अजून झाली नाही,मग हा जुना डेटा आहे का? धार्मिक ध्रुवीकरणासाठी रिपोर्ट आणला आहे का, असा सवाल काँग्रेसकडून केला जात आहे.

EAC-PM Report
Mani Shankar Aiyar: पाकिस्तानला सन्मान द्या, अन्यथा बॉम्ब फोडतील; कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रिपोर्टवरून आरोप-प्रत्यारोप

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले आहेत. पंतप्रधान समितीच्या लोकसंख्या रिपोर्टमुळे देशातील राजकारण तापलं आहे. यावरुन भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या रिपोर्टनंतर भाजपकडून मुस्लिम आरक्षणावरून काँग्रेसवर टीका सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com