Breaking News: इराणच्या ताब्यातून ५ भारतीय खलाशांची सुटका; भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

Iran Released 5 Indian Sailors: भारताची परराष्ट्र धोरणाबाबतची कूटनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. इराणच्या ताब्यात असलेल्या ५ भारतीय खलाशांची लवकरच सुटका होणार आहे.
Iran Released 5 Indian Sailors
Iran Released 5 Indian SailorsSaam TV

भारताची परराष्ट्र धोरणाबाबतची कूटनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. इराणच्या ताब्यात असलेल्या ५ भारतीय खलाशांची लवकरच सुटका होणार आहे. अलीकडेच इराणने इस्रायलचे मालवाहू जहाज पकडले होते. या जहाजात १७ भारतीय खलाशी अडकून पडले होते. त्यांची सुटका करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते.

Iran Released 5 Indian Sailors
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत इराणसोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर इराणने ५ खलाशांची सुटका करण्यास तयारी दर्शवली आहे. हे पाचही खलाशी आज संध्याकाळपर्यंत इराण येथून भारतात येणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

खलाशांच्या सुटकेबद्दल इराण सरकारचे आभार मानले आहेत. इराणने १३ एप्रिल २०२४ रोजी इस्रायलचे एक मालवाहू जहाज जप्त केले होते. या जहाजात १७ भारतीय खलाशांचा समावेश होता. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्रायलच्या मालकीचे एमएसएसी एरीज हे जहाज ताब्यात घेतले होते.

जप्त करण्यात आलेले जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दुबईच्या दिशेने जात होते. हे जहाज आपल्या हद्दीतून परवानगीशिवाय जात असल्याचा आरोप इराणने केला होता. जहाजावरील भारतीय क्रूमध्ये केरळमधील महिला खलाशी, ॲन टेसा जोसेफचाही समावेश होता.

अॅन टेसा यांची याआधीच इराण सरकारने सुटका केली होती. १८ एप्रिल रोजी त्या भारतात आल्या होत्या. आता पुन्हा इराणने ५ भारतीय खलाशांची सुटका करण्यास तयारी दर्शवली आहे. हे पाचही खलाशी आज भारतात येण्याची शक्यता आहे. अजूनही ११ भारतीय खलाशी इराणच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

Iran Released 5 Indian Sailors
Mani Shankar Aiyar: पाकिस्तानला सन्मान द्या, अन्यथा बॉम्ब फोडतील; कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com