Health tips for children Saam TV
लाईफस्टाईल

Health tips for children : स्थूलपणामुळे मुलांच्या बुद्धीवर परिणाम; अभ्यासातून मोठी माहिती उघड

Health Tips : लहान मुलांना वजन जास्त वाढल्याने मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

Ruchika Jadhav

बदलत्या जीवनशैलीमुळे आज अनेक व्यक्तींना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. फक्त तरुण आणि वृद्ध व्यक्ती नाही तर लहान मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. मुलांचं वजन वाढल्याने याचा परिणाम थेट आरोग्यावर आणि मानसिकतेवर होत असतो, असा दावा काही आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे.

लाहन मुलांच्या आहारात सतत चॉकलेट्स, कोल्डड्रींक्स, फास्टफूड आणि मिठाई असे कार्बोनेटेड आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थ असतात. सतत हेच पदार्थ खावेत असं मुलांना वाटतं. त्यामुळे ते हेच पदार्थ सतत खातात. मात्र याने मुलांच्या बुद्धीसह आरोग्यावर आणि मानसिकतेवर गंभिर परिणाम होतो.

लहान मुलांनी बाहेर फिरणे, मौज मजा करणे आणि मनसोक्त खेळले पाहिजे. याने त्यांच्या शरीराची हालचाल होते. मुलं दमतात, पडतात, रडतात या सर्व गोष्टी त्यांच्या आरोग्यासाठी गरजेच्याच असतात. मात्र सध्याची लहान मुलं फोनवर गेम खेळणे आणि तासंतास टीव्ही पाहण्यात आपला वेळ घालवतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची काहीच हालचाल होत नाही आणि मुलांना सुस्ती चढते. एकाच जागी बसून त्यांच्या शरीरातील स्थूलपणा वाढत जातो.

लहान मुलांना जडतील हे आजार

लहान मुलांना वजन जास्त वाढल्याने मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. यासह मानसिक ताण आल्याने मुलं नैराश्यात जातात आणि त्यांचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. त्याचबरोबर बुद्धीवरही याचा पिरणाम होतो. मुलांना एकाग्रतेने अभ्यास करता येत नाही.

मुलं स्थूल होऊ नये म्हणून अशी काळजी घ्या

मुलं स्थूल होऊ नयेत त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. मुलांना पालेभाज्या आणि कडधान्ये खाण्यास दिली पाहिजेत. तसेच मुलांना फोन खेळण्यासाठी वेळ ठरवून द्या. मुलांना बाहेर मैदानात खेळण्यासाठी पाठवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT