Chaat Recipes SAAM TV
लाईफस्टाईल

Chaat Recipes : पावसाळ्यात संध्याकाळची छोटी भूक मिनिटांत जाईल पळून, झटपट लिहून घ्या २ चटपटीत स्ट्रीट स्टाइल चाट रेसिपी

Monsoon Special Evening Snacks Recipe : पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत स्ट्रीट स्टाइल फूड घरीच काही मिनिटांत बनवा. सिंपल रेसिपी आताच नोट करा.

Shreya Maskar

पावसाची चाहूल लागताच आपल्याला फिरण्याची आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते. पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा तेच पदार्थ घरी सिंपल पद्धतीने बनवा. यामुळे आरोग्यही चांगले राहील आणि भूकही भागेल. ऑफिसमधून आल्यावर अवघ्या ५-१० मिनिटांत बनवता येतील अशा 'चाट' रेसिपी जाणून घेऊयात.

चना जोर गरम भेळ

साहित्य

  • रोस्टेड चना

  • बटाटा

  • लाल तिखट

  • हिरवी मिरची

  • लिंबाचा रस

  • कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • नमकीन शेव

कृती

चना जोर गरम भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये रोस्टेड चना, चिरलेला कांदा, टोमॅटो , हिरवी मिरची बारीक कापून घ्या. यात लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाका. सर्व मिश्रण छान एकजीव करा. शेवटी यात नमकीन शेव, बटाटा मॅश करून टाका. अवघ्या ५ मिनिटांत चटपटीत चना जोर गरम भेळ तयार झाली आहे. तुम्ही यात उकडलेले मक्याचे दाणे आणि रोस्टेड काजू देखील टाकू शकता.

चटपटीत भेळ

साहित्य

  • चिंच

  • खजूर

  • गूळ

  • कांदा

  • टोमॅटो

  • काकडी

  • कच्ची कैरी

  • मसाले- चाट मसाला, जिरं पावडर, काळ मीठ, लाल तिखट, कोथिंबीर

  • फरसाण, बूंदी, शेव, चुरमुरे

  • लिंबू

कृती

स्ट्रीट स्टाइल चटपटीत भेळ बनवण्यासाठी चिंच आणि खजूर १५ ते २० मिनिटे पाण्यामध्ये भिजवून मिक्सरला पेस्ट करून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये गूळ, चाट मसाला, जिरं पावडर, काळ मीठ, लाल तिखट टाकून मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ टाका. आता त्या भांड्यात चुरमुरे, फरसाण, बूंदी टाकून मिक्स करा. चांगले मिक्स झाल्यावर यात चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कच्ची कैरी आणि कोथिंबीर टाका. त्यानंतर तयार खजूर-चिंचची पेस्ट त्यात मिक्स करा. शेवटी वरून शेव टाकून लिंबाचा रस पिळा. अशाप्रकारे स्ट्रीट स्टाइल चटपटीत भेळ तयार झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

Asia Cup 2025: टीम इंडियातील किती खेळाडूंचे लग्न झाले तर किती अविवाहित?

Manoj Jarange: गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मुंबईत मनोज जरांगे गरजले

SCROLL FOR NEXT