Healthy Diet Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Healthy Diet Tips : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

Healthy Diet : पोटात पित्तचा त्रास वाढल्याने पोटाच्या समस्या येतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Healthy Diet Tips : पोटात पित्तचा त्रास वाढल्याने पोटाच्या समस्या येतात. त्यातील एक म्हणजे पोटात आग पडणे परिणामी उलटी येणे, डायरीया, पोटदुखी इत्यादी त्रास होतात. शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने अशा समस्या उद्भवतात म्हणून बऱ्याच लोकांचे असे मत असते की पोटातील उष्णता कमी करण्यासाठी पाणी जास्ती पिने गरजेचे आहे.

दिवसभरात 5 ते 6 लिटर पाणी (Water) पिने गरजचे आहे, पण फक्त पाणी पिऊनच या समस्या दूर होणार नाही. त्यासोबतच तुम्ही आहारत काही गोष्टीचा समावेश करून सुद्धा हा त्रास कमी करू शकता. तुमच्या आहारात या 5 गोष्टींचा समावेश करून तुम्ही हा त्रास कमी करू शकता. जाणून घेऊया 5 गोष्टी कोणत्या आहेत तर.

आरोग्याच्या (Health) समस्या दूर करण्यासाठी वेळेवर आणि योग्य जेवण करणे गरजेचे असते. पोटातील उष्णतेचा त्रास सारखा सारखा होत असेल तर रात्रीच्या जेवणासोबत सलादचा समावेश केला पाहिजे.

कोरफड चा समावेश तुमच्या आहारात करून हा त्रास कमी करू शकता. कोरफड थंड असते त्यामुळे याचे सेवन केल्याने पोटात आग पडण्याच्या समस्या येत नाहीत म्हणून रोज सकाळी कोरफडचा रस पिया.

पोटात आग पडण्याच्या समस्या मुळे इतर त्रास ही वाढतो त्यामुळे तुमच्या आहारात पुदिनाचा समावेश करा. त्याने पोटातील उष्णता थंड होण्यास मदत होते. त्यासाठी रोज सकाळी लिंबाच्या रसा मध्ये पुदिना रस मिक्स करून याचे सेवन केल्याने तुमचा त्रास हळूळू कमी होण्यास मदत होईल.

बडीशेप चा उपयोग करून तुम्ही या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.एक विशिष्ट जातीचे बडीशेप पाण्यात उकळून रोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे याचे सेवन केल्याने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

तसेच तुम्ही आवळच्या वापर करूनही आरम मिळवू शकता.त्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस नियमित सेवन करा. आवळा थंड असल्याने तुम्हाला होणार त्रास कमी करण्यास आवळा उपयुक्त असतो. अशा थंड पदार्थचा समावेश तुमच्या आहारात करून तुम्ही पोटात आग पडण्याच्या समस्या दूर करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

SCROLL FOR NEXT