colorectal cancer google
लाईफस्टाईल

Colorectal Cancer: सारखं पोट दुखतेय, कोलोरेक्टल कॅन्सर तर नाही ना? आताच सावध व्हा, जाणून घ्या लक्षणं

Colorectal Cancer Symptoms: कोलोरेक्टल कॅन्सर हा वृद्धांमध्ये आढळणारा सामान्य पण घातक आजार आहे. सुरुवातीला लक्षणे दिसत नसल्याने उपचार उशिरा होतात. योग्य आहार व जीवनशैलीने हा आजार टाळता येतो.

Sakshi Sunil Jadhav

कोलोरेक्टल कॅन्सर हा जगभरामध्ये तिसऱ्या क्रमांकावरील सगळ्यात सामान्य कॅन्सर मानला जातो. हा आजार कॅन्सरच्या प्रकारांपैकी एक आहे. तर WHO च्या मते १० टक्के लोक दर दिवशी या आजाराने मुत्यूमुखी होतात. हा आजार विशेषत: वृद्ध व्यक्तींमध्ये होताना आढळतो. म्हणजेच वय ५० वर्षांवरील व्यक्तींना या आजाराची लागण होते. पुढे आपण याची लक्षणे कशी ओळखायची याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

अनेक रुग्णांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे हा आजार बहुतांश वेळा उशिरा, म्हणजेच वाढत्या टप्प्यात ओळखला जातो. यामुळे उपचाराचे पर्याय मर्यादित होतात आणि मृत्यूची संख्या वाढते. कोलोरेक्टल कॅन्सर हा तुमच्या चुकीच्या जीवशैलीमुळे तसेच चुकीच्या आहारामुळे जाणवायला लागतो.

कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे

१. सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होणे.

२. पोट साफ न होणे.

३. शौचावाटे रक्त जाणे.

४. पोटदुखीचा त्रास वारंवार होणे.

५. अचानक वजन कमी होणे.

६. शरीरात iron deficiency निर्माण होणे.

वरील सर्व लक्षणे ही सामान्य किंवा चुकीच्या आहाराचे सेवन केल्यामुळे होतात असे नाही. त्यामुळे तुम्ही जीवशैलीत वेळीच महत्वाचे बदल करणे अत्यावश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही आहारात प्रथिनांचा आणि जीवनसत्वांचा समावेश करावा. त्यात हिरव्या पालेभाज्या, फळ, फळांचा रस, हंगामी पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तसेच इतर अल्कोहोल युक्त पदार्थ, तळलेले किंवा जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. याने तुम्ही कॅन्सरच्या समस्यांपासून लांब राहू शकता. तसेच वरील लक्षणे जास्त प्रमाणात जाणवू लागल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जाणे हा योग्य पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism: गोव्याच्या किनारा खूप फिरलात, आता हे 7 Hidden स्पॉट नक्की करा एक्सप्लोर

Maharashtra Govermnet : ५ लाख रोजगार निर्माण होणार, महाराष्ट्र सराकारचे ९ धडाकेबाज निर्णय

Maharashtra Live News Update : धुळ्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु

Cobra Rescue : सरपटत गेला अन् बियरच्या कॅनमध्ये अडकला; विषारी सापाच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Accident News : घरी परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT