
जेवणामध्ये बदल झाल्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
वेळेवर उपचार न घेतल्यास कोलन कॅन्सरचा धोका
सामान्य वाटणाऱ्या लक्षणांना दुर्लक्ष केल्याचा परिणाम
कोलन कॅन्सर, म्हणजेच मोठ्या आतड्याचा कर्करोग. हा आज जगभरात झपाट्याने वाढत असलेला आणि सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या कर्करोगांपैकी एक ठरत आहे. दरवर्षी लाखो लोक या आजारामुळे जीव गमावत आहेत. यांच्या मृत्यू मागचं एक गंभीर कारण म्हणजे योग्य वेळी या आजाराची ओळख न होणं. शरीरामध्ये काही बदल होत असतील ते ठळक दिसूनही दुर्लक्ष न केल्यास आणि योग्य उपचार घेतल्यास कोलन कर्करोगावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.
कोलन कॅन्सरची सुरुवात अनेकदा मलविसर्जनाच्या सवयींमध्ये बदल होण्यापासून होते. अनेक रुग्णांना अचानक मलात बदल जाणवतो. जसं की वारंवार होणारी मळमळ, बद्धकोष्ठतेचा त्रास किंवा सतत जुलाब होणं. काही वेळा मल अतिशय पातळ, रिबनसारखा दिसतो आणि मलविसर्जनानंतरही पोट पूर्ण रिकामं न झाल्यासारखे वाटते.
मलामध्ये रक्त येणं ही समस्या सगळ्यात धोकादायक लक्षण मानलं जातं. काही वेळा लोक याला फक्त फिशरचा त्रास समजून दुर्लक्ष करतात. मात्र, हे कोलन कॅन्सरचंही लक्षण असू शकतं, त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
पोटात बराच वेळ दुखणं, गॅस होणं, मुरड जाणवणं आणि पोट फुगण्यासारखी लक्षणं ही देखील दुर्लक्षित करू नका.कॅन्सरमुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हे त्रास वाढत असतात. या व्यतिरिक्त अचानक वजन कमी होणं विशेषतः डाएट किंवा एक्सरसाईजमध्ये कोणताही बदल न करता हे सुद्धा कोलन कर्करोगाचं एक गंभीर लक्षण ठरू शकतं.
कोलन कॅन्सरमध्ये शरीरात हळूहळू रक्तस्राव होतो, ज्यामुळे अॅनिमिया निर्माण होतो. अॅनिमियामुळे रुग्णाला सतत थकवा जाणवतो, श्वास घ्यायला त्रास होतो आणि चक्कर येते. ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.