Colon Cancer: सतत पोटदुखी अन् थकवा जाणवतोय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध

Colon Cancer Symptoms: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ४५ वर्षांनंतर कोलन कॅन्सर होण्याची शक्यता वाढली आहे. पोटदुखी, थकवा, रक्तस्राव, वजन कमी होणे यावर लक्ष देऊन योग्य तपासणी आणि आहाराचे पालन करणे गरजेचे आहे.
First Stage Colon Cancer
First Stage Colon Cancersaam tv
Published On

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना मोठमोठ्या जिवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागते. आजारांमधील सगळ्यात धोकादायक आजार म्हणजे कॅन्सर मानला जातो. या आजारात छोटे छोटे विषाणू (Polyps) दिवसेंदिवस शरीरात न कळत वाढतात. हा आजार ४५ वयाच्या व्यक्तींमध्ये वाढताना दिसत आहे. तुम्ही याचा तपास करुन योग्य उपचार घेऊ शकता.

कोलन कॅन्सरची लक्षणे ही कॅन्सरच्या आजारापेक्षा वेगळ्या पद्धतीची आणि सामान्य लक्षणे असतात. वयाचा ४५ सावा टप्पा गाठण्याआधी तुम्ही पुढील लक्षणांची न घाबरता तपासणी केली पाहिजे. निरोगी किंवा सामान्य लक्षण म्हणून दुर्लक्ष करणे हे तुमच्या जीवासाठी धोक्याचं असू शकतं.

First Stage Colon Cancer
Sleep Science: सकाळी लवकर उठायचा आळस का येतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

कोलन कॅन्सची सामान्य वाटणारी लक्षणे

१. पोटात तीव्र वेदना होणे.

२. बद्धकोठतेला त्रास किंवा रक्त पडणे.

३. वजन अचानक कमी होणे.

४. पोट व्यवस्थित साफ न होणे.

५. कोणतेही काम करताना थकवा जाणवणे.

६. पोट सतत भरलेले वाटणे किंवा भूक न लागणे.

Gastroenterologistच्या मते, या आजाराची सुरुवात तुमच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे होऊ शकते. विशेषत: तुम्ही जर कामानिमित्त बाहेर फिरत असाल तर तुमच्या पोटासाठी ते अजिबात पौष्टीक नसतं. तुम्ही अशावेळेस काही फळांचे सेवन करु शकता. त्यामध्ये टरबूज हा सगळ्यात चांगला उपाय आहे. कारण यामध्ये मोठ्याप्रमाणात अॅंटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण असते. याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होत नाही आणि तुम्ही दिवसभर हायड्रेट राहता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

First Stage Colon Cancer
Belly Fat : वजन कमी करायचंय? मग डाएट कशाला? जेवणात करा या मसाल्याचा वापर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com