Sleep Science: सकाळी लवकर उठायला आळस का येतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Morning Laziness: सकाळी उठायला आळस येतोय? हे फक्त सवय नाही तर विज्ञानाशी निगडीत कारण आहे. तज्ज्ञांच्या संशोधनानुसार नाईट आऊल्स सकाळच्या लोकांपेक्षा अधिक कार्यक्षम असतात.
Morning Laziness
Sleep Sciencegoogle
Published On
Summary
  • सकाळी उठायला आळस येणं हे फक्त सवयीमुळे नसतं.

  • मानवी जैविक घड्याळ आणि मेलाटोनिन हार्मोन सकाळी सुस्तीचे कारण दिसतात.

  • नाईट आऊल्सची स्मरणशक्ती व तर्कशक्ती चांगली असल्याचं संशोधनातून स्पष्ट दिसलं.

  • सोशल जेटलॅगमुळे आरोग्यावर व रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.

रात्री उशिरापर्यंत जागं राहणं कितीतरी लोकांसाठी सोपं असतं, पण सकाळी लवकर उठणं मात्र फार कठीण वाटतं. यामागचे कारण फक्त सवय नसून विज्ञानसुद्धा आहे. इम्पेरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या आणि सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, झोपेच्या पद्धती व मेंदूची कार्यक्षमता यांचा फार जवळचा संबंध आहे असे स्पष्ट केले.

तज्ज्ञांच्या या संशोधनात २६ हजारांहून अधिक वृद्धांचा समावेश होता. यात असं आढळलं की रात्री उशिरापर्यंत सक्रिय राहणारे म्हणजेच 'नाईट आऊल्स' स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि माहिती प्रक्रिया या बाबतीत सकाळी उठणाऱ्यांपेक्षा अधिक सक्षम ठरले. मात्र त्यासाठी त्यांना सात ते नऊ तासांची झोप आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. याउलट, सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्ती बहुतेक चाचण्यांमध्ये सर्वात कमी गुण मिळवतात, असा निष्कर्ष निघाला.

Morning Laziness
Fatty Liver: फॅटी लिव्हरची सुरुवातीची 5 लक्षणे कोणती? घरबसल्या करता येईल तपासणी; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

मानवी शरीरामध्ये घड्याळ म्हणजेच सर्केडियन रिदम साधारण २४ तासांच्या चक्रावर चालतं. काही लोकांच्या शरीरात हे चक्र थोडं लांबतं आणि त्यामुळे त्यांची सतर्कता रात्री वाढते. म्हणूनच रात्री उशिरा अभ्यास, लेखन किंवा सर्जनशील काम करणं सहज शक्य होतं. परंतु सकाळी उठल्यावर शरीरात अजूनही मेलाटोनिन नावाचे झोप नियंत्रित करणारे हार्मोन सक्रिय असल्याने मन सुस्त, लक्ष केंद्रीत न होणं आणि प्रतिक्रिया मंदावणं अशी लक्षणं दिसतात.

आजच्या जगण्यात मात्र शाळा, कार्यालयं आणि सार्वजनिक जीवन हे सकाळी लवकर सुरू होणाऱ्या वेळापत्रकावर अवलंबून असतं. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करणाऱ्या व्यक्तींना लवकर उठणं भाग पडतं. यामुळे त्यांचं जैविक घड्याळ आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांत ताटातूड निर्माण होते. यालाच संशोधकांनी 'सोशल जेटलॅग' असं नाव दिलं आहे. यानेच रोगप्रतिकारक शक्की कमी होते. थोडक्यात सांगायचं झालं, तर रात्री उशिरापर्यंत झोप न लागणं किंवा झोपायची इच्छा न होणं ही फक्त सवय नसून, मानवी जैविक घड्याळाची देणगी आहे.

Morning Laziness
Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com