Sakshi Sunil Jadhav
दैनंदिन आयुष्यात काही चुकीच्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने थेट तुमच्या लिव्हरला धोका निर्माण होऊ शकतो.
तुम्ही जर चुकीचा आहार आणि अपूर्ण झोपेच्या समस्यांना सामोरं जात असाल तर हा तुमच्यासाठी एक मोठा धोकाच आहे.
पुढे आपण लिव्हर खराब होण्याची कारणे जाणून घेणार आहोत.
तुम्ही जर वारंवार गोळ्या (Painkillers)घेत असाल तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या लिव्हरवर होत असतो.
खूप जास्त तेलातले, साखरेचे किंवा पॅकेज्ड फूड्स खात असाल तर तुमचे लिव्हर खराब होऊ शकतं.
तुम्ही वेळेवर पौष्टीक अन्न खात नसाल तर तुमच्या पचनक्रिया मंदावण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.
तुम्ही काही हालचाल करत नसाल खाऊन एका जागेवर बसणे पसंत करत असाल तर तुम्हाला लिव्हरच्या समस्येला सामोरे जावे लागते.