आपल्यापैकी अनेकांना चहाची चाहत असते. काहींच्या दिवसाची सुरुवातच चहाच्या घोटाने होते. आता थंडीची चाहूल लागलीये आणि या काळात चहाचा एक घोट तुम्हाला ऊर्जा देऊन जातो. आपल्या घरात चहा बनवण्यासाठी स्टील किंवा ॲल्युमिनियमचं भांडं वापरण्यात येतं. मात्र तुम्हाला माहितीये आहे का यापैकी कोणते भांडे चहा बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे आणि कोणतं भांडं शरीरासाठी हानिकारक आहे?
मुळात चहा कोणत्याही भांड्यात बनवला तरी त्याचा आरोग्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. कारण काही भांड्यांमध्ये विषारी केमिकल्स असतात. ज्यांचा चहासोबत रिएक्शन होऊन शरीराला हानी पोहोचू शकते. त्यामुळे चहा करण्यासाठी स्टील किंवा ॲल्युमिनियमपैकी कोणतं भांडं वापरावं ते जाणून घेऊया.
स्टीलच्या भांड्यात चहा बनवल्याने त्याची चव आणि क्विलीटी तशीच राहते. यामध्ये चहा बनवल्याने त्यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांचंही नुकसान होत नाही. याशिवाय चहा बनवल्यानंतर त्याच्या रंगामध्येही कोणता फरक दिसून येत नाही. त्यामुळे या भांड्यामध्ये चहा बनवणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक नाहीये.
एल्युमिनियम हे बॉक्साइटने बनलेलं असतं. हा एका प्रकारचा थायरोटॉक्सिक धातूचा एक प्रकार आहे. त्यात बनवलेला चहा शरीरालाच हानी पोहोचवतो. घरी अनेकदा ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये चहा बनवला तर गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. इतकंच नाही तर यामुळे तुमच्या चहाची चव देखील खराब होऊ शकते.
दोन्ही भांडी आपल्या सर्वांच्या घरी असतात. अशावेळी स्टीलच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे आहेत आणि ॲल्युमिनियममुळे शरीराला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चहा दोन्हीपैकी एकाने बनवायचा असेल तर स्टीलचे भांडे वापरणं फायदेशीर ठरू शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.