सर्वांना सुकामेवा आवडतोच पण ठरवलेल्या प्रमाणापेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने ॲलर्जी होऊ शकते. दररोज मर्यादित प्रमाणात बदाम खाल्ल्याने कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. जेव्हा तुम्ही खूप बदाम खातात, तेव्हा तुमचे शरीर खनिजे आणि जीवनसत्त्वे शोषून घेते, यामुळे मळमळ, पोटदुखी, अतिसार आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
बदाम खाण्याचे तोटे
खूप जास्त बदाम खाल्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. यामुळे ॲलर्जीचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही ॲलर्जी टाळण्यासाठी बदाम नेहमी भिजवून खावे. तुम्ही दररोज १० ते १५ बदाम खाऊ शकता, यापेक्षा जास्त बदाम खाल्यास तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.
बदामामध्ये जास्त प्रमाणात ऑक्सलेट असल्यामुळे मुतखडा होऊ शकतो. यामुळे किडनीशी संबंधित समस्या असल्यास बदाम खाऊ नयेत. अधिक प्रमाणत बदाम खाल्याने बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ होऊ शकते.
बदाम खाण्याचे फायदे
बदामामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते, जे तुमची हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते. हाडे आणि दातांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
तुम्ही दररोज ४ बदाम खाऊ शकता. ७ ते ८ बदाम खाऊ नये. सकाळी नाश्त्यापूर्वी बदाम खावेत. सर्दी किंवा खोकला झाल्यास बदाम खाऊ नये. तुम्ही गूळ आणि बदाम एकत्र खाऊ शकता. गूळ आणि बदाम एकत्र खाल्याने मेंदूला रक्तपुरवठा वाढण्यास मदत होते.
बदामामध्ये आवश्यक पोषक आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जे सांधेदुखीपासून आराम देण्यास मदत करतात. बदाम तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतो. बदाम तुमच्या शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करतात आणि वाईट कोलेस्टेरॉल रोखते. त्याच वेळी, बदाम तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. बदामामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.
Edited by- अर्चना चव्हाण
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.