

प्रत्येक आई-वडीलांना वाटते की, आपल्या मुलाने आपले ऐकले पाहिजे. मात्र असे झाले नाही तर पालक आपल्यामुलांना ओरडतात. अर्थात ओरडणे हे शिस्त लावण्यासाठीच असते. पण मुलांना चांगले वाईट शिकवण्याची दुसरी पद्धत सुद्धा असू शकते. यात मुले लहान असो वा मोठं पालक त्यांना ओरडतातच. कधीतरी चुकीचे वागणे, चुकीचे बोलणे, ही बाब मुलांमध्ये नवीन नाही. पण, तुम्ही या गोष्टी कशा हाताळता आणि तुमच्या मुलांना योग्य दिशेने दाखवता हे चांगल्या पालकत्वाचे लक्षण आहे. चला तर जाणून घेऊ चांगले बनण्यासाठी टिप्स.
मुलांना समजावून सांगणे
आपल्या मुलाने आपल्या करिअरमध्ये यशस्वी व्हावे, त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु, यश किंवा अपयशासाठी एकटे मूल जबाबदार नाही. कारण, पालकांना मुलांचे पहिले शिक्षक म्हणतात, अशा परिस्थितीत तुम्हीच त्यांना योग्य दिशा देऊ शकता. मुलांना प्रेमाने समजावून सांगा, शिव्या देऊन किंवा ओरडून नाही.
मुलांना तुमच्यावर अवलंबून ठेवू नका
तुमच्या मुलाला स्वतःवर अवलंबून राहायला शिकवा. स्वतःची काळजी घेण्यास सक्षम असणे किती महत्त्वाचे आहे ते स्पष्ट करा. जेणेकरून, तो त्याचे काम सांभाळू शकेल.
मुलांवर प्रेम करा
अनेक वेळा पालक त्यांच्या कामात इतके व्यस्त होतात की ते आपल्या मुलांवर किती प्रेम करतात हे दाखवायला किंवा व्यक्त करायला विसरतात. त्यांच्याशिवाय त्यांना कसे वाटते? मुलांशी बोला आणि त्यांच्यावर प्रेम करायला आणि त्यांची काळजी घ्यायला विसरू नका.
तुमची चुक असेल तर माफी मागणे
केवळ लहान मुलांनीच नाही तर मोठ्यांनीही त्यांच्या चुकांसाठी माफी मागणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांसमोर त्यांच्या चुका मान्य करायला सुरुवात केली नाही तर मूलही त्यांच्या चुका स्वीकारणे सोडून देईल. त्यामुळे तुमची चूक असेल तर माफी मागा.
बेसिक शिस्त शिकवा
कोणालाही उलट बोलू नये, मारामारी करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये, प्रत्येकाची मदत करावी, मोठ्यांशी आदराने बोलावे, वेळेचे पालन करावे, दिवसाचे नियोजन करावे अशा बेसिक आणि आवश्यक शिस्तीचे पालन करायला मुलांना शिकवावे.
Edited By: Sakshi Jadhav