Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

Best foods for tiffin in winter: उन्हाळ्यात आपण काहीही जेवण ठेवले तरी ते गरमच राहते. दुपारपर्यंत जेवण थोडं गरमच राहत पण हिवाळा आला की तुम्ही टिफिनमध्ये जे काही घेऊन जाता ते पूर्णपणे थंड होते. त्यामुळे जेवणाला चव लागतं नाही.
food
foodyandex
Published On

हिवाळा सुरू होताच, जे लोक टिफिन घेऊन जातात किंवा ज्यांच्या घरात लहान मुलांसाठी टिफिन तयार केला जातो त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो.अनेक वेळा टिफिनमध्ये काय बनवायचे आणि घ्यायचे हेच समजत नाही, जे थंड झाल्यावरही चवदार राहते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत. हे सर्व पदार्थ फक्त खाण्यासाठीच चांगले नसतात, परंतु ते थंड झाल्यावरही तुम्ही खाऊ शकता.

पराठा

हिवाळ्याच्या पराठे सर्वात जास्त खाल्ले जातात. या हंगामात कोबी आणि मुळाही मिळतो. अशा परिस्थितीत तुम्ही बटाटा, कोबी, पनीर किंवा मुळा यांचे पराठे तयार करून टिफिनमध्ये घेऊ शकता. पराठे खूप चवदार लागतात. हे तुम्ही चहासोबत खाऊ शकता. 

मसाला पुरी

पराठा खायला आवडत नसेल तर या मोसमात मीठ, ओवा आणि मिरची घालून पुरी तयार करा. चहासोबत खायला चविष्ट लागते. तुम्ही ते फक्त लोणचे आणि चहासोबत घेऊ शकता. यासाठी भाज्यांची गरज भासणार नाही.

food
Health: टवटवीत चेहरा आणि काळ्याभोर केसांसाठी उपयुक्त ठरेल तुमच्या किचनमधील 'हा' पदार्थ; सुरकुत्याही म्हणतील बाय बाय

व्हेजटेबल पुलाव

हिवाळ्याच्या हंगामात अनेक भाज्या बाजारात उपलब्ध होतात, त्या पुलावमध्ये घालून तुम्ही त्याची चव वाढवू शकता. व्हेजटेबल पुलाव स्वादिष्ट लागते. व्हेजटेबल पुलाव थंड झाल्यावरही स्वादिष्ट लागते. तुम्ही व्हेजटेबल पुलाव चटणीसोबत करू शकता. 

ढोकळा

जर तुम्हाला टिफिनमध्ये काही जड डिश घेऊन जायचे नसेल तर ढोकळा घरी सोप्या पद्धतीने तयार करा. ढोकळा घरी तयार केल्यानंतर टिफिनमध्ये चटणीसोबत घ्या. हिवाळ्यात खायलाही छान लागते.

फ्राय इडली

इडली सांबार गरम असले तरचं चवीला छान लागते, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फ्राय इडली टिफिनमध्ये घेऊ शकता. फ्राय इडली अशी थंडीही छान लागते

Edited by- अर्चना चव्हाण

food
Free Visa for Indian: भारतीयांना 'या' देशात मिळणार व्हिसा फ्रि एन्ट्री

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com