आपल्या देशात पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हा आकडा वाढला आहे. आणि दरवर्षी हा आकडा वाढत चालला आहे. लोक अनेकदा देशात किंवा परदेशात काही चांगल्या ठिकाणी जाण्याचा विचार करतात. जेव्हा आपण देशातील आणि जगातील लोकप्रिय ठिकाणांना भेट देतो तेव्हा आपल्याला विविध संस्कृतीतील लोकांना भेटण्याची संधी मिळते. परंतु प्रवासासाठी खूप पैसे मोजावे लागतात. जर तुम्हाला परदेशात प्रवास करायचा असेल तर या देशात तुम्हाला व्हिसा फ्रि एन्ट्री मिळेल.
परदेशात प्रवास करण्याची अनेक भारतीयांची इच्छा असते. काही लोकांना याची संधी देखील मिळते. तसेच आतंरराष्ट्रीय सहलीला जाणे हे अनेकांचे स्वप्न आहे. आतंरराष्ट्रीय सहलीला जाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसा. व्हिसा म्हणजे व्हिजिटर्स इंटरनॅशनल स्टे अॅडमिशन. म्हणजेच दुसऱ्या देशात राहण्याची अधिकृत परवानगी. पण जगात असे काही देश आहेत जेथे भारतीयांना व्हिसाची गरज लागत नाही. चला तर जाणून घेऊया हे देश कोणते आहेत.
जगात २६ देश असे आहेत की जेथे भारतीयांना व्हिसाची गरज लागत नाही. वेगवेगळ्या देशात यासाठीची नियमावली वेगळी आहे. यामध्ये थाइलंड देशात भारतीयांसाठी ३० दिवसांचा फ्रि म्हणजेच मोफत व्हिसा मिळतो. याशिवाय अंगोला आणि मलेशिया सारख्या देशातही भारतीयांना ३० दिवसांचा फ्रि व्हिसा मिळतो. मकाऊ देशातही भारतीय ३० दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात. माइक्रोनेशिया मध्येही तुम्ही ३० दिवस व्हिसाशिवाय फिरु शकतात. आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात.
जर तुम्ही मॅारिशिस आणि बारबाडोस सारख्या देशात फिरण्यासाठी जाणार असाल तर या देशात तुम्हाला ९० दिवसांचा फ्रि व्हिसा मिळेल. केन्या, गाम्बिया, हैती, कारिबती, ग्रॅनेडा, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट विसेंट आणि ग्रेनेडाइन्स, सेंट किट्स आणि नेवी आणि सेनेगल यासारखे अनेक देश भारतीयांना व्हिसा फ्रि एन्ट्री देतात. याचा अर्थ भारतीय या देशांमध्ये व्हिसाशिवाय ९० दिवस फिरु शकतात आणि याच लाभ घेऊ शकतात. तुम्हीही या देशात फिरण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
भारतीय नागरिकांना भूटान आणि कझाकिस्तान देशात १४ दिवसांसाठी व्हिसा फ्रि मिळतो. १४ दिवसांसाठी तुम्ही येथे राहण्याचा आणि फिरण्याचा आनंद घेऊ शकता. फिजी देशात १२० दिवसांचा मोफत व्हिसा मिळतो. तर डोमनिका देशात १८० दिवस म्हणजे ६ महिन्यांचा व्हिसा फ्रि मिळतो. तसेच ईरान देशामध्ये भारतीयांना ४ फेब्रुवारी २०२४ नंतर व्हिसाची गरज पडत नाही. मोफत व्हिसामुळे तुमचे अनेक पैसे वाचू शकतात.आणि फिरण्यासाठी कमी पैसे मोजावे लागतील.
Edited by : Priyanka Mundinkeri