Weight Loss: वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

foods for weight loss: वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम आणि डाएट फॅालो करत असतो. परंतु योग्य डाएट न केल्यास वजन नियंत्रित न राहता वाढते. यासाठी जाणून घ्या कोणत्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश केला पाहिजे.
Weight loss
Foods for weight lossYandex
Published On

बदलती जीवनशैली आणि खराब खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि आपण अनेक आजारांना बळी पडतो. तसेच योग्य आहार न घेतल्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यातच वजन वाढण्याचा धोका वाढतो. वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच योग्य आहार घेणे खूप गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहार पोषक तत्वाने संपूर्ण असले पाहिजे. ज्यामुळे योग्य आहाराचा फायदा वजन लवकर कमी करण्यासाठी होतो. वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. जाणून घ्या.

ग्रीन टी

ग्रीन टी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी एक चमत्कारिक पेय आहे. जे वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये ईसीजीसी (ECGC) अँटीऑक्सिडंट असते. जे फॅट्स कमी करण्याचे काम करते. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे आणखी एक अँटिऑक्सिडेंट देखील भरपूर प्रमाणात असते, जे यकृतातल्या चरबीचे उर्जेमध्ये रुपांतर करण्यास मदत करते. तसेच ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल आणि पेक्टिन असतात. ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. ग्रीन टी मध्ये लिंबाचा रस टाकून प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी अधिक फायदा होतो.

कॅाफी आणि खोबरेल तेल

कॅाफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते. त्यामुळे कॅाफी चे सेवन केल्यास चयापचयाची गती वाढते आमि सुधारते. त्यामुळे पचनक्रिया योग्यरित्या झाल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते.तसेच व्यायामापूर्वी कॅाफीचे सेवन केल्यास शरीरला एनर्जी भेटते आणि खूप वेळेपर्यंत भूख लागत नाही. खोबरेल तेलमध्ये ट्रायग्लिसराइड्स असते. जे ऊर्जा पातळी वाढवण्यास आणि आळशी चयापचय गतिमान करण्यास मदत करते. भूक नियंत्रित ठेवण्यासोबतच चरबी कमी करण्यासही मदत करते. खोबरेल तेलामध्ये जेवण बनवल्यास जेवणाची चव वाढते आणि वजन कमी करण्यासाठी लाभदायक ठरते.

एवोकाडो आणि पालेभाज्या

एवोकाडो हा पोषक तत्वांने भरलेला फळ आहे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तसेच त्यात हेल्दी फॅट्स असतात, म्हणजेच मोनोसॅच्युरेटेड असतात ज्यामुळे भूक दूर होते. तुम्ही एवोकाडो टोस्ट म्हणजेच एवोकाडो आणि ब्राऊन ब्रेड तुम्ही दररोजच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता तसेच .साइड सॅलेड म्हणूनही तुम्ही एवोकाडो खाऊ शकता. पालेभाज्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व, प्रोटीन, कॅल्शियम आणि मिनरल्स असतात.

Weight loss
Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

जास्तीत जास्त भाज्या खाल्ल्याने शरीरला योग्य पोषक तत्वे मिळतात. आणि हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी मदत करतात. एवोकाडो आणि पालेभाज्या यांना एकत्रित किंवा यांचे मिश्रण खाल्ल्यानंतर भूक कमी लागते. आणि जास्त वेळेपर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. एवोकाडो फळ शरीराला भाजीतील अँटिऑक्सिडंट्स शोषून घेण्यास मदत करते.

केळी आणि पीनट बटर

जेवणामध्ये कार्बोहायड्रेटस आणि प्रोटीनचे प्रमाण नियमित असणे गरजेचे आहे. व्यायामनंतर केळी आणि पीनट बटर म्हणजेच शेंगदाण्याचे लोणी खावे. यामध्ये लीन प्रोटीन असते. जे शरीराला उर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळे पोट भरलेले असल्याचे वाटते आणि भूख लागत नाही. हेल्दी कार्बोहायड्रेट आणि लीन प्रोटीन व्यायामानंतर स्नायूंना बळकट आणि पुनरुत्पादनासाठी काम करतात .

प्रथिने आणि फॅट्स दोन्ही शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. केळीपासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात तर पीनट बटरपासून आपल्याला प्रथिने आणि फॅट्स मिळतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by: Priyanka Mundinkeri

Weight loss
Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com