दालचिनी हे प्रत्येक घरातल्या ,स्वयंपाक गृहामध्ये असणारा गरम मसाला आहे. दालचिनी हा गरम मसाला गोड आणि तिखट या दोन्ही पदार्थांमध्ये वापरला जातो. दालचिनी जेवणातील प्रत्येक पदार्थांचा स्वाद वाढवतात. या गरम मसाल्यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, फॅास्फॅारस ,कॅल्शियम आणि कार्बोहाइड्रेट असतात. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंटस असतात. दालचिनीमध्ये असलेला औषधी गुणधर्म आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. दालचिनीचे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. त्यातच रिकामी पोटी दालचिनीचे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या,रोज एक ग्साल दालचिनीचे पाणी प्यायल्यास कोणते फायदे होतील.
दालचिनीचे पाणी रिकामी पोट प्यायल्यास नसांमधील कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच ब्ल्ड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते.आणि हृदयासाठी लाभदायक ठरते. तसेच हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजारांचा प्रभाव कमी करण्यास फायदेशीर ठरते.
दालचिनीमध्ये अॅंटीबॅक्टेरियल आणि अॅंटीव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे दररोज दालचिनीचे पाणी प्यायल्यास आपल्या शरीरातील रोगप्रत्कारशक्ती वाढते आणि सर्दी खोकला ताप सारख्या आजारांवर लवकर मात करता येते. या पाण्याचे सेवनामुळे व्हायरल आजार होण्याची शक्यता टळते.
दररोज दालचिनीचे पाणी प्यायल्यास मेंदूला चालना मिळण्यास मदत होते. आपली विचारशक्ती मजबूत होते. आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. दालचिनीचे पाणी प्यायल्यास तुमची एकाग्रता वाढू शकते. जेणेकरून स्मरणशक्ती वाढण्यासाठी फायदा होतो. दालचिनीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
दररोज दालचिनीचे पाणी प्यायलाने त्वचेवर ग्लो येतो. पिंपल आणि त्वचेवरचे डाग कमी होण्यास मदत करतात. तसेच चेहऱ्यावरील सूजन कमी होते. आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
दालचिनीमध्ये पचनासाठी नैसर्गिक गुणधर्म असतात जे पोट फुगणे, अपचन ,जळजळ आणि गॅस सारख्ये पोटाच्या समस्यावर रामबाण उपाय ठरतात. याचे सेवन केल्यास पोटाचे आजार दूर होतील. दालचिनीचे पाणी प्यायल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच वजन कमी करण्यासाठी मदत होते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited by : Priyanka Mundinkeri