Mental Health SAAM TV
लाईफस्टाईल

Mental Health : चांगल्या मानसिक आरोग्यासाठी 'या' लोकांपासून चार हात लांबच रहा, नाहीतर आयुष्यातील शांती होईल भंग

Toxic People : आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे आपले मानसिक आरोग्य खराब करतात. त्यांना टॉक्सिक लोक असे म्हणतात. अशा लोकांपासून वेळीच सावध व्हा आणि आपले आयुष्य चांगले जगा.

Shreya Maskar

आपण जेथे राहतो, काम करतो, तेथे टॉक्सिक लोकांपासून दूर रहायला हवं. कारण अशा लोकांमुळे मानसिक तणाव वाढतो. ज्याचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. आपल्या आयुष्यातील अशा लोकांना वेळीच ओळखणं गरजेचा आहे.

दैनंदिन जीवनात आपली खूप लोकांशी ओळख होते. आपल्या आणि त्यांच्या विचारांमध्ये फरक असतात. त्यांचे विचार आणि आपले विचार जुळणे खूप कठीण असतं. पण अशात जर कोणी आपल्यावर स्वतःचे विचार लादत असेल तर वेळीच अशा व्यक्तींपासून दूर रहा. कारण भविष्यात ही लोक तुमच्या आयुष्यात अडचणी निमार्ण करू शकतात. अशा लोकांसोबत चुकूनही मैत्री करू नये. ते तुमच्या मानसिक आरोग्यास धोकादायक ठरू शकते. अशा लोकांना आपण मॅनिपुलेटिव्ह लोक अस सुद्धा म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. या लोकांशी व्यवहार करणे त्यांच्या सोबत मैत्री करण खूपच जास्त त्रासदायक आणि मानसिक तणाव वाढवणार असतं. ते तुम्हाला त्यांच्या बोलण्यात अशा प्रकारे अडकवतात की तिथून बाहेर पडणे फार कठीण जाते.

वेळेवर टॉक्सिक लोकांपासून दूर नाही गेलो तर ते आपला किती आणि कसा वापर करून घेतील सांगता येत नाही. तुमच्याशी गोड गोड बोलून, प्रेमाच आमिष दाखवून स्वतः चा फायदा करून घेतात आणि वेळ आली की तुमच्याशी वाईट वागायला लागतात. टॉक्सिक लोक तुमच्या तोंडावर तुमच्याशी छान बोलतील मात्र मागे तुमची खराब प्रतिमा निमार्ण करतील.

टॉक्सिक लोक नेहमी कोणत्या तरी कारणामुळेच तुमच्या आयुष्यात येतात आणि स्वतःचा फायदा करून जातात. ही लोक प्रचंड स्वार्थी स्वभावाची असतात. तुमच्या आयुष्यात काय चालू आहे. याच त्यांना काही पडलेल नसतं. त्यांच्या गरजेनुसार ते तुमचा वापर करतात आणि मग सोडून जातात. स्वतःची स्तुती करायला त्यांना फार आवडते. टॉक्सिक लोक आपल्याला त्यांच्या बोलण्यात अडकवून भीती निमार्ण करतात. त्यामुळे तुमचा ताण वाढतो आणि नैराश्य येते. अशी लोक कधीच तुम्हाला प्रोत्साहन देणार नाहीत. कायम तुम्हाला कमी लेखत राहतील.

टॉक्सिक लोकांपासून कसे दूर रहावे?

  • टॉक्सिक लोकांना अशी सवय असते की, ते इतरांना त्यांच्या बोलण्यात अडकवतात. मग त्यांना त्याचं बोलणं महत्त्वाच वाटू लागत. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्यात येऊ नका.

  • नेहमी तुम्हाला दुय्यम स्थान देणाऱ्या लोकांपासून लांब रहा.

  • ज्या लोकांना तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त रस असेल त्यांना तुमच्या आयुष्याबद्दल काही सांगू नका. कारण तुम्ही दिलेल्या माहितीचा ते चुकीचा वापर करू शकतात. भविष्यात चारचौघात तुम्हाला खालीपणा दाखवतील.

  • टॉक्सिक लोकांशी एका मर्यादेत बोला. अशा लोकांना जास्त वेळ देऊ नका.

  • जर एखाद्याचे बोलणे तुम्हाला दुःखी करत असेल. त्यांचे शब्द तुम्हाला त्रास देतात. तर अशा लोकांपासून हळूहळू दूर राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT