लग्न हे एक असे बंधन आहे, जे दोन हृदयांना जोडत असते. दोन कुटुंबांना एकत्र आणत असते. याचदरम्यान ओपन मॅरेजचा ट्रेंड खूप वाढलाय. काय असतं ओपन मॅरेज? काय होतात मॅरेजाचा परिणाम हे जाणून घेऊ.
जेव्हा पती-पत्नी एकमेकांच्या विवाहबाह्य संबंधाला सहमती देतात, तेव्हा त्याला ओपन मॅरेज म्हणतात. याचाच अर्थ लग्नानंतरही एखाद्याचे प्रेमप्रकरण असेल तर त्याला वाईट मानलं किंवा व्याभिचार मानले जात नाही. तर या विवाहात परस्पर समंजसपणा असतो. ओपन मॅरेजमध्ये कोणत्याही जोडीदाराला विवाहबाह्य संबंधांमध्ये कोणतीही अडचण येत नसते. म्हणजेच काय नवरा लग्नानंतर गर्लफ्रेंड बनवू शकतो, तर पत्नीलाही लग्नानंतर बॉयफ्रेंड शोधू शकते.
अनेकाच्या मते, ओपन मॅरेज हे व्यक्तींना स्वतंत्रता देत असते. काहींच्या मते, ओपन मॅरेज प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे. यातून तुमचा पार्टनर तुमच्याशी खोटं बोलत नाही,आणि तो तुमची फसवणूक करत नाही. ओपन मॅरेजमुळे तुम्ही तुमच्या इच्छा बेडकपणे पूर्ण करत असतात. परंतु या विवाहमुळे नात्यात काही वाईट परिणाम होत असतात. अनेकवेळा विवाहित जोडप्याला नात्यात असुरक्षितपणा वाटतो. नवरा- बायकोला एकमेंकांविषयी द्वेष बाळगत असतात. ओपन मॅरेजमधील पती-पत्नीचा एकमेकांवर विश्वास राहत नाही. तसेच लैंगिक संबंध सुरक्षित राहत नाही.
समाजात ओपन मॅरेजला स्वीकारलं जात नसल्याने अनेकांकडून टीका होते. दरम्यान ओपन मॅरेज करायचा किंवा नाही हे जोडप्यावर अवलंबून असतं. कारण अशाप्रकारचा विवाह नातं मजबूत करतं आणि नात्यात कडूपणा देखील आणत असतं. ओपन मॅरेजचा निर्णय घेण्याआधी तुम्ही आधी तुमच्या जोडीदाराची भावना समजून घ्या. जर तुम्ही हे नातं संभाळण्यात यशस्वी होत असाल तरच ओपन मॅरेजचा विचार करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.