नवी दिल्ली : आसामच्या आयपीएस अधिकाऱ्याचं प्रमोशन झालं. ते आसाम राज्याचे गृहसचिव झाले. आयपीएस अधिकाऱ्याचं आयुष्य सर्व सुरळीत चाललं होतं. एकेदिवशी या अधिकाऱ्याची पत्नी आजारी पडली. आजारी पत्नीच्या उपचारासाठी गृह सचिवाने चार महिन्यांची सुट्टी घेतली. मात्र, चार महिन्यानंतर या आजारी पत्नीचा मृत्यू झाला. त्याचदिवशी रुग्णालायातून गोळी झाडल्याचा आवाज आला. पुढे काही वेळात पत्नी आणि पतीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
नवरा-बायकोमध्ये वाद , मारहाण या सारख्या घटना घडताना पाहिल्या असतील. पण पती-पत्नीने एकमेकांसाठी जीव दिला, या घटना फार कमी ऐकल्या असतील. आसाममधील अशाच एका जोडप्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
आसामचे गृह सचिव शिलादित्य चेतिया यांची पत्नी मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. मंगळवारपर्यंत गृहसचिवाची पत्नी रुग्णालयात उपचार घेत होती. शिलादित्य यांची पत्नी आगोमनी यांनी मंगळवारी जीव सोडला. त्यानंतर दहा मिनिटाच्या आत शिलादित्य यांनी स्वत: वर गोळी झाडून जीवन संपवलं.
४० वर्षांच्या आगोमोनी गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. पत्नीच्या आजारामुळे शिलादित्य यांनीही कामातून सुट्टी घेतली होती. गेल्या चार महिन्यांपासून ते सुट्टीवर होते. मंगळवारी आगोमोनी यांच्या निधनानंतर शिलादित्य यांनीही जीवन संपवलं. आगोमोनी यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांची तब्येत अधिक बिघडली. त्यानंतर मंगळवारी सांयकाळी चार वाजून २५ मिनिटांनी प्राण सोडला.
पत्नीच्या निधनानंतर चेतिया आयसीयूच्या केबिनमध्ये गेले. त्यानंतर पत्नीसाठी प्रार्थना करायचं सांगून शिलादित्य यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केबिनमधून बाहेर जाण्यास सांगितलं. थोड्यावेळाने आयसीयूमधून गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी केबिनच्या दिशेने धावले. त्यवेळी शिलादित्य यांचा मृतदेह पत्नीच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात दिसला. शिलादित्य यांनी शासकीय पिस्तुलाने डोक्यावर गोळी झाडली.
शिलादित्य २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आसामच्या तिनसुकिया आणि सोनितपूरमध्ये एसपी म्हणूनही काम केलं आहे. गृहसचिव होण्याआधी त्यांनी आसामच्या चौथ्या बटालियनचं कमांडेट म्हणूनही काम केलं आहे. २०१५ साली स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रपती पोलीस पदक देखील मिळालं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.