Assam News: एका कोंबड्यानं घेतला ३ जणांचा जीव; विहिरीत सापडले तिघांचे मृतदेह

Assam Three People Died Due to Cock : आसाममधील एका गावात कोंबड्यामुळे तीन जणांचा जीव गेल्याची घटना घडलीय. कोंबड्याला पकडायला गेलेल्या तीन जणांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आलाय.
Assam News: एका कोंबड्यानं घेतला ३ जणांचा जीव; विहिरीत सापडले तिघांचे मृतदेह
Assam Three People Died Due to Cock

आसाममध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. येथील कछार जिल्ह्यातील एका गावात एका कोंबड्यानं तीन तरुणांचा जीव घेतल्याची समोर आलंय. अशा विचित्र घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ माजलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कोंबड्याला पकडण्यासाठी एका लहान मुलाने घराजवळील छोट्या विहिरीत उडी मारली. पण बराच वेळ झाल्यानंतरही तो बाहेर आला नाही म्हणून त्याला बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या मोठ्या भावाने विहिरीत उडी मारली. पण तोही बाहेर न आल्याने एका स्थानिक युवकाने विहिरीत उडी मारली. हे तिघेही पुन्हा बाहेर आले नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या तिघांचा शोध घेतल्यानंतर या तिघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यामुळे एका कोंबड्यामुळे ३ जणांचा जीव गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मनजीत देब आणि प्रोसेनजीत देब (दोघे भाऊ)आणि अमित सेन अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. कछार जिल्ह्यातील लखीमपूर ही घटना घडलीय. येथील देब कुटुंबाने कोंबड्या पाळल्या होत्या. त्यातील एक कोंबडा अचानक विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील दोन भाऊ मनजीत देब आणि प्रोसेनजीत देब हे दोघे विहिरीत उतरले. पण खूप वेळ झाल्यानंतरही हे दोघं वरती आले नाहीत तेव्हा त्याच्या शेजारी असलेल्या अमित सेन नावाचा स्थानिक युवकानेही विहिरीत उडी मारली. पण ते तिघेही वरती आले नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Assam News: एका कोंबड्यानं घेतला ३ जणांचा जीव; विहिरीत सापडले तिघांचे मृतदेह
Buldhana Crime : संशयाचं भूत मानगुटीवर! बायकोची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; नवऱ्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

स्थानिकांच्या माहितीवरुन पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पथकानं विहिरीतून ३ युवकांचे मृतदेह बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत विषारी वायूमुळे या तिघांचे गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलं. दरम्यान, ही घटना दुर्दैवी असून विहिरीत पडलेल्या भावाला वाचण्यासाठी २ जणांनी विहिरीत उडी घेतली. परंतु तिघेही पुन्हा परतले नाहीत. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक नुमल महत्ता यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com