हरियाली तीज श्रावण महिन्यात साजरी केला जाते. हरियाली तीज हा सण विवाहित महिलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. हरियाली तीजच्या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रीया माता पार्वती आणि महादेवाची पूजा आणि व्रत करतात. हरियाली तीजचे व्रत केल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुखशांती नांदते त्यासोबतच तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते.
यंदा हरियाली तिजचे व्रत ७ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी माता पार्वतीचे व्रत केल्यामुळे तुमच्या मन आध्यात्मिक होते. हरियाली तीजच्या दिवशी साकाळी स्वच्छ स्नान करून तुळशीजवळ दिवा लावून महादेवाकडे पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर माता पार्वती आणि महादेवाची पूजा करून त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवला पाहिजेल. हरियाली तीजच्या संध्याकाळी घराबाहेर सुंदर अशी रांगोळी काडून घराच्या मुख्य द्वाराजवळ दिवा लावा त्यासोबतच घरातील मंदिरामध्ये तूपाचा दिवा लावा आणि देवासमोर धूप लावा. त्यानंतर महादेवाची आणि माता पार्वतीची आरती करून सर्वानी त्यांचे आशिर्वाद घ्या.
हरियाली तीजचं व्रत केल्यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता वाढते त्यासोबतच. तुमच्या वैवाहिक जिवणामध्ये सुख-शांती नांदण्यास मदत होते. हरियाली तीजची पूजा करताना विवाहित महिलांनी सिंदूर लावा आणि चांगलं शुंगार करून पूजा करावी यामुळे माता पार्वतीची तुमच्या कृपा राहिल.
1) हरियाली तीजच्या दिवशी घरातील स्वच्छतेची काळजी घ्या.
2) हरियाली तीजचे व्रत करताना तुमच्या पतीशी वाद घालू नका.
3) हरियाली तीजची पूजा करताना फक्त सकारत्मक गोष्टीचा विचार करा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.