तुम्ही जर पदवीधर असाल आणि बँकेत काम करण्याची इच्छा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना करण्यात आली आहे. यामध्ये ५२८० जागांसाठी पदभरती सुरु करण्यात आली आहे.
सर्कल बेस्ड ऑफिसरच्या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकता. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १२ डिसेंबर होती परंतु, मिळालेल्या माहितीनुसार १७ डिसेंबर करण्यात आली आहे. अर्ज (Application) करण्यासाठी उमेदवाराला SBI ची अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. अर्ज प्रक्रिया कशी असेल, अर्ज कसा कराल हे जाणून घेऊया.
अहमदाबाद - ४३० पदे
अमरावती - ४०० पदे
बेंगळुरू- ३८० पदे
भोपाळ - ४५० पदे
भुवनेश्वर - २५० पदे
चंदीगड - ३०० पदे
चेन्नई- १२५ पदे
ईशान्य - २५० पदे
हैदराबाद - ४२५ पदे
जयपूर- ५०० पदे
लखनौ - ६०० पदे
कोलकाता- २३० पदे
महाराष्ट्र: ३०० पदे
मुंबई मेट्रो - ९० पदे
नवी दिल्ली - ३०० पदे
तिरुवनंतपुरम - २५० पदे
उमेदवाराने कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त पदवी केलेली असायला हवी. तसेच प्रादेशिक भाषेचे ज्ञान असायला हवे.
उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्ष असायला हवे. त्याचवेळी राखीव प्रवर्गातून उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
सामान्य, OBC आणि EWS ७५० रुपये
SC/ST/PH : मोफत
ऑनलाइन (Online) लेखी परीक्षा
स्क्रीनिंग चाचण्या
मुलाखत
उमेदवाराला अधिकृत वेबसाइटला (Website) भेट द्यावी लागेल.
लिंकवर क्लिक करून पुढील प्रोससला सुरुवात होईल.
त्यानंतर तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
फॉर्म भरा आणि सबमिट करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.