10th 12th Exam Questions  Saam TV
लाईफस्टाईल

10th 12th Exam Questions : दहावी आणि बारावीची परीक्षा नेमकी किती अवघड? अहवालातून महत्वाची माहिती आली समोर

SSC and HSC Exam Questions Deemed Difficult : विविध शैक्षणिक मंडळांच्या प्रश्नपत्रिका एकत्रीत करून यावर अभ्यास करण्यात आलाय. या अभ्यासात कठीण प्रश्नांची संख्या जास्त असल्याचं समोर आलंय.

साम टिव्ही ब्युरो

राज्यातील इयत्ता १०वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षा झालेल्या आहेत. परीक्षा होऊन याचे निकाल देखील हाती आले आहेत. दर वर्षी निकाल हाती आल्यावर कोणत्या राज्यातील परीक्षा कशी होती, म्हणजेच किती प्रश्न कठीण होते? किती प्रश्न सोपे होते? याचे निरिक्षण केले जाते.

त्यानुसार या वर्षी देखील यावर अभ्यास करण्यात आला. विविध राज्यांतील १० वी आणि १२ वीच्या परीक्षांवर अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्रातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षांमध्ये ५४ टक्के प्रश्न कठीण होते, अशी माहिती समोर आली आहे.

यासाठी विविध शैक्षणिक मंडळांच्या प्रश्नपत्रिका एकत्रीत करून यावर अभ्यास करण्यात आलाय. या अभ्यासात कठीण प्रश्नांची संख्या जास्त असल्याचं समोर आलंय.

कोणी केला हा अभ्यास?

एनसीईआरटी (NCERT) अंतर्गत येणाऱ्या (PARAKH) या संस्थेद्वारे हा अभ्यास करण्यात आला आहे. 2018 ते 2022 या वर्षात केलेल्या अभ्यासात 16 शैक्षणिक मंडळांचा सहभाग होता. तसेच तब्बल 18,000 प्रश्नांचे योग्य पद्धतीने परीक्षण करण्यात आले होते.

अभ्यासात समोर आलेली आकडेवारी

अभ्यासात पुढे असे समोर आले की, बोर्डाच्या परीक्षेतील 54% प्रश्न कठीण स्वरुपाचे होते. तर 30% प्रश्न मध्यम स्वरुपाचे आणि फक्त 16% प्रश्न सोपे होते. यापैकी विद्यार्थ्यांनी मोठी उत्तरे (36%) आणि लहान उत्तरे (46%) देणे आवश्यक होते.

त्रिपुरामधील प्रश्न सर्वाधिक कठीण

तुलनेने, त्रिपुरा माध्यमिक शिक्षण मंडळाने 67% प्रश्न कठीण, तर उर्वरित 33% प्रश्न सोपे घेतले होते. यानुसार इयत्ता १०वी आणि इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारले जाणारे ५४ टक्के प्रश्न कठीण असतात असे समोर आले आहे.

कोणत्या बोर्डात किती टक्के कठीण प्रश्न विचारले?

त्रिपुरा माध्यमिक मंडळ कठीण प्रश्नांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये एकूण ६६.६० टक्के अवघड प्रश्न होते. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात ५४ टक्के प्रश्न अवघड होते.

गोवा राज्यातील बोर्डात ४४.६६ टक्के अवघड प्रश्न विचारले गेले. छत्तीसगडमध्ये 44.44 टक्के प्रश्न अवघड होते. तर पश्चिम बंगालच्या विद्यार्थ्यांना 33.33 टक्के प्रश्न कठीण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

Wedding Look: या लग्नसराईसाठी जान्हवीचे 'हे' देसी लूक ट्राय करा, तुम्हीही दिसाल ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह

Liver Cancer Risk: कंबरदुखी वाढत चाललीये? लिव्हर कॅन्सरचा धोका नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Pune : पुण्यात भयंकर हत्याकांड, बिझनेसमनने बायकोचा गळा दाबला, भट्टीमध्ये बॉडी जाळली, अन् राख....

SCROLL FOR NEXT