10th 12th Supplementary Exam: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावी, बारावीच्या पुरवणी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सविस्तर

10th 12th Supplementary Exam Will Start From 16 July: दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. लेखी परीक्षा १६ जूनपासुन सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दहावी आणि बारावीची पुरवणी परिक्षा
10th 12th Supplementary ExamSaam Tv

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षेचे वेळापत्रक आता जाहीर झालेले आहे. १६ जुलैपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

बारावीच्या सर्वसाधारण विषय आणि ऑनलाईन परीक्षा १६ जुलै ते ०८ ऑगस्ट दरम्यान होणार (10th 12th Supplementary Exam) आहेत. तर दहावीच्या परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै दरम्यान होणार आहे. दरम्यान परीक्षा संबंधीची सर्व माहिती आणि वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत. समाज माध्यमांवरील व्हायरल वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचना विभागीय मंडळाने दिल्या आहे.

दहावी पुरवणी परीक्षेसंदर्भात (10th Exam) प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधी दरम्यान होणार आहे. तर बारावीची (12th exam) पुरवणी परिक्षेसंदर्भात प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही १६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये होणार आहे. बारावीची माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयाची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ही परीक्षा सात आणि आठ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे.

दहावी आणि बारावीची पुरवणी परिक्षा
Career After 10th: दहावीनंतर पुढे काय? विद्यार्थ्यापुढे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या

पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती (Supplementary Exam Update) मिळतेय. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेच वेळापत्रक अंतिम असेल, असे संबंधित प्रशासनाने सांगितले आहे. याच वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असं आवाहन देखील प्रशासनाने केली आहे.

दहावी आणि बारावीची पुरवणी परिक्षा
10th SSC Result : पोरांपेक्षा पोरीच ठरल्या सरस, गुणवंतांचा टक्काही वाढला; वाचा दहावीच्या निकालाची महत्वाची वैशिष्ट्ये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com