
Supplementary Exam : जून महिन्यात दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला. यात अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटे वेळ देण्यात येणार आहे.
पूर्वी मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत १० मिनिटे वेळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येत होता. परंतु, वाढत्या कॉपीच्या प्रकारामुळे २०२२-२३ च्या परीक्षेत हा वेळ काढून टाकण्यात आला. पण या गोष्टींचा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यामुळे पुन्हा एकदा हा वेळ पुरवणी परिक्षेत देण्यात येणार आहे. या वेळेमुळे विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी जास्तीचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चांगले यश मिळवायची ही सुवर्णसंधी आहे.
इयत्ता १२ वीसाठी लेखी परीक्षा मंगळवारी १८ जुलै २०२३ ते मंगळवार ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहे. तसेच इयत्ता बारावीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा मंगळवार १८ जूलै २०२३ ते शनिवार ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घेतली जाणार आहे. १२वीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखांचे सविस्तर वेळापत्रक तुम्हाला बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.
तर दहावीची परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दहावी पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रदर्शित झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.