SSC-HSC Supplementary Exam: दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा कधी?, तारीख जाहीर

SSC-HSC Supplementary Exam Date: राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या तारखेची माहिती दिली आहे. १६ जुलैपासून ही परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र गुरूवारी ४ जुलैपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
SSC-HSC Supplementary Exam: दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा कधी?, तारीख आली समोर
SSC-HSC Supplementary ExamSaam Tv

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने ही महत्वाची माहिती दिली आहे. परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र गुरूवारी ४ जुलैपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे आयोजन १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेचे आयोजन १६ जुलै ते ३० जुलै या दरम्यान करण्यात आले आहे. कोणतेही शुल्क न घेता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना देण्याची सूचना राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी केली आहे.

SSC-HSC Supplementary Exam: दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा कधी?, तारीख आली समोर
Pune Porshe Accident: पोर्शे अपघातातून सुटला, फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला! विशाल अगरवालला पुन्हा अटक; प्रकरण काय?

महत्वाचे म्हणजे, जुलै-ऑगस्ट या महिन्यांदरम्यान होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी मुद्रित करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. प्रवेशपत्राची मुद्रित प्रत देण्यासाठी कोणतीही वेगळी फी घेतली जाणार नाही. त्यामुळे कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

SSC-HSC Supplementary Exam: दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा कधी?, तारीख आली समोर
Mumbai Crime : घराच्या मागच्या दरवाजातून शिरून गर्लफ्रेंडसोबत केलं भयानक कांड, गुन्हा कबुल करताच बापाने मुलाला पोलिसांत नेलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com