Ganesh Puja Saam TV
लाईफस्टाईल

Ganesh Puja: आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा राहिलाय? बुधवारी गणरायाची 'ही' पुजा ठरेल लाभदायी

Spirituality News : तुमच्या आयुष्यात सुद्धा अडचणींचा डोंगर उभा राहिला असेल तर गणेश मूर्तीची मनोभावे कशी सेवा करायची याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

हिंदू धर्मात गणरायाला विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी विघ्नहर्ता देवतेची आपल्यावर कृपादृष्टी असणे गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य अडचणींनी भरलेलं असतं. आता तुमच्या आयुष्यात सुद्धा अडचणींचा डोंगर उभा राहिला असेल तर गणेश मूर्तीची मनोभावे कशी सेवा करायची याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

नामाचा जप

बालगणपती, भालचन्द्र, बुद्धिनाथ, धूम्रवर्ण, एकाक्षर, एकदंत,गजकर्ण, गजानन, गजनान, गजवक्र, गजवक्त्र, गणाध्यक्ष, क्षेमंकरी, अमित, गदाधर, गणाध्यक्षिण, गुणिन, हरिद्र, हेरंब, कपिल, कवीश, कीर्ति, कृपाकर, कृष्णपिंगाक्ष, क्षेमंकरी, क्षिप्रा, मनोमय, मृत्युंजय या नावांचा गुरूवारी जप केला पाहिजे. या नावांचा जप केल्याने तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी मदत होते.

शेंदूर लेप

गणरायाची पुजा करताना आज तुमच्या घरात जी मूर्ती असेल तिला शेंदूरला लेप द्या. शेंदूर पाण्यात विरघळवून मूर्तीला लेप द्या. त्यानंतप या मूर्तीच्या पुजेला सुरूवात करा.

मूर्तीजवळ या वस्तू ठेवा

गणरायाची पूजा करताना मूर्तीजवळ या गोष्टी असणे आवश्यक आहे. त्यासाठी धूप, दिवा, दुर्वी, नैवेद्य, शेला, अगरबत्ती, प्रसाद या गोष्टी मूर्तीजवळ ठेवा. त्यानंतर पुजेला सुरुवात करा.

उकडीचे मोदक

बुधवारी तुम्ही पुजा करत असाल तर प्रसादाला मोदक आवश्य बनवा. मोदकाचा प्रसाद पुजा पूर्ण झाल्यानंतर परिसरातील लहान मुलांमध्ये वाटून द्या. असे केल्याने चिमुकल्यांच्या माध्यमातून तुम्हाला गणरायाचा आशिर्वाद मिळेल.

टीप : ही सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT