Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

Gautami Patil : सण- उत्सवातील अश्लील डान्सवरून आता राज्यात नवा वाद पेटलाय.. अशातच एका डान्सनं गौतमी पाटीलच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. नेमकं प्रकरण काय आहे? अश्लील डान्सवरून सरकार कसं आक्रमक झालयं.पाहूयात या रिपोर्टमधून.
Gautami Patil  dance
Gautami Patil Dahi Handi dance controversy latest newssaam tv
Published On
Summary
  • दहीहंडी आणि इतर सण-उत्सवातील कथित आक्षेपार्ह नृत्यावरून महाराष्ट्रात वाद वाढला आहे.

  • गौतमी पाटील यांच्या नृत्याबाबत तक्रारी आणि कारवाईची मागणी होत असल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

  • सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परवानगी, नियम आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन हा महत्त्वाचा मुद्दा

ऐकलंत काय म्हटली गौतमी. दहीहंडीतल्या याच डान्समुळे गौतमी वादात सापडलीय. कारण या अश्लील डान्समुळे गौतमी पाटीलविरोधात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. आधीच सण-उत्सावामधील अश्लील डान्सवरून वातावरण तापलेलं असतानाच आता अश्लील डान्सरवर कायदेशीर कारवाईची मागणी होऊ लागलीय. ठाण्यातील नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी डान्सर गौतमी पाटील आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसात तक्रार दिलीय.

Gautami Patil  dance
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या नृत्यावरून नवा वाद! भाजप नगरसेविकेची थेट पोलिसांत तक्रार

यापूर्वीच पुण्यातल्या अश्लील डान्समुळे डान्सर राधा पाटीलवर आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहीहंडीत अनेक राजकीय पक्षांनी भरसभेत डान्सरला नाचवून अश्लीलतेचा कळसचं गाठला. त्यामुळे आता रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळही सक्रीय झालयं. डान्सरना कार्यक्रम करण्यापूर्वी ‘योग्यता प्रमाणपत्र’ घेणं बंधनकारक करण्यात आलयं. अशातच डान्सर ऐश्वर्या जाधवनं योग्यता प्रमाणपत्र असतानाही कार्यक्रमासाठी दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्याचा आरोप केलाय. तसेच कला सादर करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे, असंही जाधव हीने म्हटलयं.

Gautami Patil  dance
Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

दहीहंडी आणि सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली सादर होणाऱ्या अश्लील डान्सवर एकीकडे महिला राजकारण्यांनी कठोर भूमिका घेतली असली तरी दुसरीकडे या डान्सरवरील बंधनांमुळे उपजीविका चालवण्यासाठी योग्यरित्या कला सादर करणाऱ्या इतर कलाकारांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयोजकांनीही लावणीचं पावित्र्य राखत कार्यक्रमाचं आयोजन करणं गरेजचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com